Akshay Kumar ला ‘त्या’ रात्रीची चूक पडली महागात; पार्टीमध्ये घडलेली धक्कादायक गोष्ट आणि…

Akshay Kumar | अक्षय कुमार आजही 'ती' रात्र विसरला नसेल... त्या घटनेनंतर अभिनेत्याच्या आयुष्यात आलं मोठं संकंट, प्रसिद्ध अभिनेत्रीची साथ तर सुटलीच पण..

Akshay Kumar ला 'त्या' रात्रीची चूक पडली महागात; पार्टीमध्ये घडलेली धक्कादायक गोष्ट आणि...
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 8:58 AM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वात असे अनेक प्रसंग घडतात जे अनेक वर्षानंतर सर्वांसमोर येतात आणि सर्वत्र खळबळ माजते. सध्या अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल एक गोष्ट समोर येत आहे, जी फार जुनी आहे. पण ‘त्या’ घटनेनंतर खिलाडी कुमारच्या आयुष्यात अनेक बदल झाले. अक्षय कुमार बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असल्यामुळे त्याच्याबद्दल अनेक गोष्टील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज अभिनेता त्याच्या आयुष्यात आनंदी आहे. पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत अक्षय कुमार आनंदी आयुष्य जगत आहे. पण ‘त्या’ रात्री अक्षय याने एक चूक केली नसती तर, आज ट्विंकल खन्ना नाही तर, अभिनेत्री रवीना टंडन अभिनेत्याची पत्नी असते.

पण त्या रात्री असं काय झालं ज्यामुळे रवीना हिने अभिनेत्याची साथ सोडली आणि झालेला साखरपुडा देखील अभिनेत्रीने मोडला. आज अभिनेता ट्विंकल हिच्यासोबत आनंदी असला तरी एक काळ असा होता जेव्हा अक्षय आणि रवीना चाहत्यांना कपल गोल्स देत होते. दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं होतं. पण रवीना आणि अक्षय यांचं लग्न होवू शकलं नाही.

अक्षय आणि रवीना यांच्या प्रेमाची सुरुवात ‘मोहरा’ सिनेमाच्या सेटवर झाली. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांची मैत्री घट्ट झाली आणि कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगू लागली होती. दोघे लग्न देखील करणार होते. एवढंच नाही तर, अक्षय आणि रवीना यांनी मंदिरात साखरपुडाल देखील केला.

हे सुद्धा वाचा

अक्षय आणि रवीना यांच्याच्या नात्याचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचला होता, पण एका रात्री असं काही घडलं ज्यामुळे रवीना हिने अक्षय याच्यासोबत असलेलं नातं मोडलं. अक्षय कुमार ‘खिलाडीयो का खिलाडी’ सिनेमाचं शुटिंग करत होता. तेव्हा अक्षय आणि अभिनेत्री रेखा यांच्यात जवळीक निर्माण होवू लागली. जेव्हा ही गोष्ट रवीना हिच्यापर्यंत पोहोचली तेव्हा अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.

दरम्यान, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्या पार्टी अक्षय याने रेखा यांच्यासोबत अधिक वेळ घालवला. अक्षय याच्या याच एका चुकीमुळे रवीना हिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ती रात्र दोघांच्या नात्याची शेवटी रात्र ठरली.

रवीना हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अक्षय कुमार याने अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत २००१ मध्ये लग्न केलं. त्यानंतर काही वर्षात अभिनेत्री रवीना टंडन हिने देखील श्रीमंत उद्योजक अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.