रवी दुबेची पत्नी सरगुनचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? अखेर त्याने सोडलं मौन

रवी दुबे आणि सरगुन मेहता ही जोडी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. 2013 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सरगुनच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता संगीतकार जानीने मौन सोडलं आहे.

रवी दुबेची पत्नी सरगुनचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? अखेर त्याने सोडलं मौन
रवी दुबे, सरगुन मेहता, जानीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 8:59 AM

अभिनेत्री सरगुन मेहताने टेलिव्हिजनवर नाव कमावल्यानंतर पंजाबी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तिने पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि तिथेही तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सरगुन आणि तिचा पती रवी दुबे यांची जोडी खूप हिट आहे. हे दोघं मिळून एक प्रॉडक्शन हाऊस चालवतात. त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडतात. टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. अशातच सरगुन आणि संगीतकार जानी यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. आता या चर्चांवर खुद्द जानीने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत जानी म्हणाला, “मी सरगुनला एक व्हॉइस नोट पाठवला होता. त्यात मी म्हटलं होतं की सरगुनसारखी मुलगी, मैत्रीण, गर्लफ्रेंड, पत्नी किंवा बहीण म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवी. ती खूप खास व्यक्ती आहे. मी तिच्यापेक्षा जास्त मेहनती मुलीला पाहिलं नाही. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे म्हणून लोकांना असं वाटतं की काहीतरी सुरू आहे. पण माझ्यात आणि सरगुनमध्ये असं काहीच नाही.”

हे सुद्धा वाचा

“आमचं काहीच अफेअर नाही, हे मी स्पष्ट करतो. रवी भावासोबत माझं खूप चांगलं नातं आहे. सरगुनसोबतही माझी चांगली मैत्री आहे. तिचा स्वभाव इतका चांगला आहे की तिच्यासारखी मुलगी कोणत्याही नात्याने तुमच्या आयुष्यात असावी असं मला वाटतं. तिचा उद्देशच असा आहे की 24 तास काम करणं. चित्रपटाचं शूटिंग, बिझनेस, मित्रमैत्रिणींसोबत नातं जपणं, एवढ्या हिंमतीने वागणं.. हे सर्व गुण तिच्यात आहेत”, असं त्याने पुढे स्पष्ट केलं.

सरगुन आणि जानी यांनी एकत्र बऱ्याच म्युझिक व्हिडीओंसाठी काम केलंय. ‘तितलियाँ वर्गा’, ‘गल्ला तेरियाँ’, ‘तेरी आँखे’, ‘किस मोऱ्ह ते’, ‘लारे’ यांसारख्या गाण्यांचा त्यात समावेश आहे. रवी आणि सरगुन यांनी 7 डिसेंबर 2013 रोजी लग्न केलं होतं. या दोघांनी ’12/24 करोल बाग’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.