AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहासाची सोनेरी पानं अन् सह्याद्रीचे कडेकपारे, ‘रावरंभा’तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी!

'रावरंभा'तून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी (historical love story) उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या  राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.

इतिहासाची सोनेरी पानं अन् सह्याद्रीचे कडेकपारे, ‘रावरंभा’तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी!
रावरंभा पोस्टर
| Updated on: Mar 30, 2021 | 10:47 AM
Share

मुंबई : येत्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातून शिवकालातील कथानकं रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ (Ravrambha)  हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. ‘रावरंभा’तून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी (historical love story) उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या  राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे (Ravrambha new film based on historical love story poster launch).

शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे ‘रावरंभा : द ग्रेट वॉरियर ऑफ 1674’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘बेभान’, ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’, ‘करंट’ असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी ‘रावरंभा’चं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण आता लवकरच सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

काय असणार कथा?

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच ‘रावरंभा’ या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे (Ravrambha new film based on historical love story poster launch).

पाहा पोस्टर :

कोण होते रावरंभा?

रावरंभा हे फलटणचे बजाजी निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे ते पुत्र होते. त्यांच्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नसलं, तरी त्यांचा कार्यकाळ खूप मोठा आहे. इतिहासाच्या अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. 18व्या शतकात मराठ्यांच्या इतिहासात निंबाळकर हे घराणं खूपचं प्रसिद्ध होतं. त्यांनी मराठ्यांच्या शिरात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक मोठ्या कामिगिरी केल्या आहेत.

1707 मध्ये रावरंभा निंबाळकर यांनी धनाजी यांचं मार्गदर्शन घेतं, औरंगजेब याच्या छावणीवर हल्ला केला होता. रावरंभा यांना निजामाने ‘रावरंभा’ ही पदवी दिल्याचं आढळतं. रावरंभा म्हणजे सतत जिंकणारा असं त्याचा अर्थ होतो. त्यांचं मूळ नाव ‘रंभाची बाजी’ असं होतं. रावरंभा हे देवीचे मोठे भक्त असल्याचं सुद्धा आढळतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तुळजापूरमध्ये मंदिराजवळ तटबंदी आणि दरवाजेसुद्धा बांधले आहेत. चित्रिकरणाला सुरुवात झालेलं पोस्टर पाहून चाहत्यांना या ऐतिहासिक चित्रपटाची उत्कंठा लागून राहिली आहे.

(Ravrambha new film based on historical love story poster launch)

हेही वाचा :

TMKOC | ‘तारक मेहता..’च्या ‘या’ दोन ‘परममित्रां’मध्ये झाला मोठा वाद! सेटवर एकमेकांपासून राहतात दूर…

‘होणार सून मी..’ आधी तब्बल तीन मालिका, बॉलिवूड डेब्यूमध्येच किसिंग सीन, लाडकी सून तेजश्री प्रधानचा प्रवास

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.