अमिताभ बच्चन यांच्यासमोर जया यांनी काढला रेखा यांच्या कानाखाली जाळ, ‘या’ अवस्थेत बघितले आणि थेट.
बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात देखील असतात. काही दिवसांपूर्वीच चक्क चाहत्याच्या गाडीवर मुंबईत फिरताना अमिताभ बच्चन हे दिसले होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मुंबई : बाॅलिवू़डमधील अनेक लव्ह स्टोरी (Love story) कायमच चर्चेत असतात. यादरम्यान चित्रपटाच्या सेटवर असे काही किस्से घडतात की, ते अनेक वर्षे चर्चेत राहतात. असाच एक किस्सा राम बलराम या चित्रपटाच्या सेटवर घडला होता. ज्यानंतर सर्वजण हैराण झाले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा यांची लव्ह स्टोरी बाॅलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली प्रेम कहाणी आहे. यांचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. जया बच्चन यांना अजिबातच अमिताभ बच्चन आणि रेखा (Rekha) यांना एका चित्रपटामध्ये काम करू देण्याची इच्छा नव्हती. मात्र, असे काही घडले की, जया बच्चन यांनी थेट चित्रपटाच्या सेटवरच मोठा गोंधळ घातला होता.
राम बलराम या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा हिला साईन केले जाणार असल्याची चर्चा सुरू असताना चित्रपट निर्मात्यांशी जया बच्चन यांनी संपर्क करत रेखा ऐवजी जीनत अमान हिला या चित्रपटासाठी साईन करण्यासाठी सांगितले. मात्र, रेखा यांना हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत करायचा होता.
चित्रपट निर्मात्यांना रेखा हिने देखील मोठी आॅफर दिली, ज्यामुळे निर्माते हे रेखा हिला नकार देऊच शकले नाहीये. या चित्रपटासाठी एकही रूपये फिस घेणार नसल्याचे रेखाने सांगितले. रेखा त्यावेळी बाॅलिवूडची टाॅप अभिनेत्री होती. यामुळे चित्रपट निर्माते देखील रेखाला नकार देऊ शकले नाहीत.
रेखाला या चित्रपटात घेतल्याचे कळताच जया बच्चन यांनी आपला मोर्चा हा चित्रपटाच्या सेटकडे वळवला. यावेळी सेटवर अमिताभ बच्चन आणि रेखा गप्पा मारताना दिसले. हे बघितल्यानंतर जया बच्चन यांना पारा चढला आणि त्यांनी थेट रेखाच्या कानाखाली जाळ काढला. हे पाहून उपस्थित लोकांना मोठा धक्का बसला.
विशेष म्हणजे ज्यावेळी जया बच्चन यांनी रेखाच्या कानाखाली मारली त्यावेळी तिथे अमिताभ बच्चन हे देखील उपस्थित होते. मात्र, जया बच्चनच्या रागासमोर अमिताभ बच्चन यांनाही काही बोलता आले नाही. जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा हा किस्सा 46 वर्षांच्या अगोदरचा आहे. मात्र, अजूनही यावर कायमच चर्चा होते.