बाळ हिरावून फसवणूक, रिअल लाईफ ‘कुसुम मनोहर लेले’सोबत घडलेलं भीषण वास्तव काय? ती महिला आज कुठेय?

1986 मध्ये पुण्यात एका महिलेची फसवणूक करुन तिचं बाळ तिच्यापासून हिरावण्यात आलं. कुसुम मनोहर लेले या नाटकाचा शेवट सकारात्मक दाखवला असला, तरी त्यातील पात्रांच्या तोंडून सत्यकथा ऐकायला मिळते ( Real Life Kusum Manohar Lele Story)

बाळ हिरावून फसवणूक, रिअल लाईफ 'कुसुम मनोहर लेले'सोबत घडलेलं भीषण वास्तव काय? ती महिला आज कुठेय?
कुसुम मनोहर लेले आणि चंद्र आहे साक्षीला या सत्य घटनेवर आधारित कलाकृती
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 4:02 PM

मुंबई : ‘कुसुम मनोहर लेले’ (Kusum Manohar Lele) हे अशोक समेळ लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित नाटक 1988 मध्ये रंगभूमीवर प्रचंड गाजलं होतं. विनिता ऐनापुरे यांनी सत्य घटनेवर लिहिलेल्या कथेवर हे नाटक आधारित होतं. सभ्य-सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणाचा मुखवटा टराटरा फाटल्यानंतर भ्रमिष्ट झालेल्या सुजाता देशमुख या घटस्फोटित स्त्रीची ही कहाणी. नाटकात शोकांतिका न दाखवता हॅपी एंडिग ठेवण्यात आला, परंतु ज्या महिलेवर हे नाटक बेतलं, तिचं आयुष्य एक शोकांतिकाच ठरली. (Real Life Kusum Manohar Lele Chandra Aahe Sakshila What is Real Incidence Story)

नाटकाचं कथानक काय?

सुकन्या कुलकर्णी-मोने, संजय मोने आणि गिरीश ओक यांच्या ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकात मुख्य भूमिका आहेत. पुण्यातील सुयोग विवाह मंडळात घटस्फोटित सुजाता देशमुख पुनर्विवाहासाठी नाव नोंदवते. सुयोगचं काम निर्मलाताई पाहत असतात. प्रत्येक विवाहेच्छुक व्यक्तीची त्या जातीने शहानिशा करुनच नोंदणी करुन घेत. व्यसनी आणि वासनांध असलेल्या पहिल्या नवऱ्याच्या अनुभवाने पोळलेली सुजाता पुन्हा लग्न करताना अतिसावध असते.

मनोहर लेलेच्या बहिणीमुळे ट्विस्ट

घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केलेल्या मनोहर लेले या तरुणाचं स्थळ निर्मलाताईंकडे येतं. सुजाताला हे स्थळ आपल्यासाठी योग्य वाटतं. मनोहर लेलेच्या व्यक्तिमत्त्वाने आणि अतिप्रेमळ स्वभावामुळे सुजाताला भुरळ पडते. दोघांच्या भेटीगाठी वाढत जातात. इतक्यात मनोहरची बहीण सुमी निर्मलाताईंना भेटून त्याच्याबद्दल सावध करते. मनोहर सरळमार्गी नसल्याचं ओरडून सांगते. दुसरीकडे, मनोहर सुमीच कशी खोटारडी आहे, हे निर्मलाताईंना पटवून देतो. शंकेची पाल चुकचुकल्याने निर्मलाताई सुजाताला मनोहर लेलेंबाबत सावध करण्याचा प्रयत्न करते. मात्र मनोहरच्या पहिल्या बायकोचा निर्मलाताईंना फोन येतो आणि त्यांचा संशयही मिटतो.

कुसुम लग्नाआधी गरोदर

मनोहर सुजाताला प्रेमाने ‘कुसुम’ हे नाव देतो. दरम्यानच्या काळात सुजाताला त्याच्यापासून दिवस जातात. सुजाता आणि मनोहर साखरपुडा करुन पुण्यापासून काहीशा दूर असलेल्या औंध भागात नव्या फ्लॅटवर राहायला जातात. मनोहरचा घटस्फोट झाल्यावर ते कायदेशीररीत्या लग्न करणार असतात. आपल्या गरोदरपणाबद्दल बभ्रा होऊ नये, यासाठी सुजाताही ऑफिसमधून बिनपगारी रजा घेते. बाळंतपणासाठी नाव घातलेलं हॉस्पिटलही नवं असतं. एकंदरच ही बातमी फुटू नये, याची दक्षता मनोहर घेताना दिसतो.

कुसुमला मनोहरचा धक्का

अखेर सुजाता अर्थात ‘कुसुम’ बाळंत होते. तिच्या आणि बाळाच्या सेवेसाठी मनोहरने घरात चोवीस तासांसाठी बाई ठेवली असते. हॉस्पिटलमधून घरी येताच ती बाळाचा ताबा घेऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळू लागते. अशातच मनोहर सुजाताला एक धक्का देतो. ‘बाळाला सांभाळणारी बाई ही माझी पहिली बायको कुसुम आहे. तिला मूल होत नसल्याने मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि मुलाला जन्म दिला. हे मूल तुझं आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा अस्तित्वात नाही. तुझी गरज संपल्याने घरातून निघून जा’ असं दटावतो.

सुजाता प्रचंड मोठा धक्का बसतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मनोहरच्या वागणुकीचं तिला आश्चर्य वाटतं. आर्जव, विनवण्यांपासून धमक्या, पोलिसांची भीतीही ती दाखवते. मात्र मनोहरने अत्यंत चलाखीने मुलाच्या जन्माचा कोणताच कायदेशीर पुरावा तिच्या हाती लागणार नाही, याची पुरेपूर दक्षता बाळगलेली असते.

कुसुम नाव कसं पडलं?

जवळपास 35 वर्षांपूर्वी पुण्यात घडलेली ही घटना असल्यामुळे फोटो, सीसीटीव्ही, डीएनए टेस्ट यासारखे प्रगत तंत्रज्ञान तेव्हा नसल्याचं ध्यानात घ्यायला हवं. कागदोपत्री खऱ्या पत्नीचं नाव यावं आणि हे बाळ तिचंच असल्याची नोंद व्हावी, यासाठी मनोहर लेले सुजाताला आपल्या खऱ्या पत्नीचं कुसुम हे नाव देतो.

पुण्यात 1986 मध्ये एका महिलेसोबत हा प्रकार घडला होता. सरोगसीसारख्या पर्यायांचा आर्थिक खर्च वाचवण्यासाठी मूल होऊ न शकणारी जोडपी ज्या पळवाटा शोधू पाहतात, त्यांचं काळं वास्तव या घटनेनं अधोरेखित केलं होतं. घटस्फोटित, विधवा किंवा असहाय्य तरुणींचा फायदा घेत त्यांच्याकडून बाळ मिळवण्याचा हा प्रकार होता.

चंद्र आहे साक्षीला मालिकेत काय?

कलर्स मराठी वाहिनीवर अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री ऋतुजा बागवे यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘चंद्र आहे साक्षीला’ (Chandra Aahe Sakshila) ही मालिका प्रक्षेपित झाली. स्वाती गुळवणी आणि श्रीधर काळे अशी मुख्य पात्रांची नावं दाखवली आहेत. या मालिकेचे कथानक ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकाशी साधर्म्य असल्याचे बोलले जात होते. मालिकेच्या कथानकाला फाटा देत वेगळा ट्रॅक दाखवण्यात आला आहे. परंतु मूळ कथा विनिता ऐनापुरे यांचीच असल्याने ते याच घटनेवर बेतल्याचे स्पष्ट होते.

प्रत्यक्ष घटनेत काय झालं?

1986 मध्ये पुण्यात एका महिलेची फसवणूक करुन तिचं बाळ तिच्यापासून हिरावण्यात आलं. नाटकाचा शेवट सकारात्मक दाखवला असला, तरी त्यातील पात्रांच्या तोंडून सत्यकथा ऐकायला मिळते. त्या महिलेसोबत घडलेलं भीषण वास्तव कल्पनेपेक्षाही भयाण आहे. ते बाळ ‘लेले’ दाम्पत्याकडेच राहिलं. लेले दाम्पत्य आजही कुठेतरी उजळ माथ्याने समाजात फिरत आहे. तर ते बाळ पस्तिशीत आलं आहे. तर त्यांच्या फसवणुकीला बळी पडलेली ‘सुजाता उर्फ कुसुम’ कुठल्याशा आश्रमात दाखल झाली होती. वर्ध्यातील एका आश्रमात ती महिला जीवन कंठत असल्याचं बोललं जातं. मात्र याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

संबंधित बातम्या :

‘चंद्र आहे साक्षीला’नंतर सुबोध भावे पुन्हा सिनेमाकडे, बालगंधर्वांचे नाटक रुपेरी पडद्यावर

‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना

(Real Life Kusum Manohar Lele Chandra Aahe Sakshila What is Real Incidence Story)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.