नाटकात (Play) काम करताना अनेकदा कलाकार त्यांच्या वेशभूषेबाबत विविध प्रयोग करताना दिसतात. प्रेक्षकांना, रसिकांना अधिकाधिक त्या नाटकात कसं गुंतवून ठेवायचं, याचा विचार ते करतात. असाच एक प्रयोग करत असताना नाटकात शंकराची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने चक्क गळ्यात जिवंत नाग (snake) घातला होता. नाटकात महादेवाची भूमिका करणाऱ्या पात्राने गळ्यात जिवंत नाग साप घालून रंगमंचावर एण्ट्री घेतल्याने प्रेक्षकांसह सहकलाकारसुद्धा गर्भगळीत झाले. बेळगाव (Belgaon) जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील संकोनटी गावात घडली आहे.
इंचगेरी मठामध्ये जगज्योती बसवेश्वर नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे नाटक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी रंगमंचावर संगीताची साथ देणारे कलाकारदेखील उपस्थित होते. पण जेव्हा महादेवाचे पात्र करणाऱ्या कलाकाराने एंण्ट्री घेतली, त्यावेळी सगळ्यांना धक्काच बसला.
नाटकात शंकराच्या गळ्यात जिवंत नाग, सहकलाकारांची ‘भागमभाग’
नाटकात महादेवाची भूमिका करणाऱ्या पात्राने गळ्यात जिवंत नाग साप घालून रंगमंचावर एण्ट्री घेतली. यावेळी प्रेक्षकांसह सहकलाकारसुद्धा गर्भगळीत झाले. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील ही घटना आहे.#Belgaon #Snake #Video pic.twitter.com/ThQImi4jpS— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2022
महादेवाच्या वेशभूषेतील कलाकाराने गळ्यात चक्क जिवंत नाग घातलेला प्रेक्षकांना आणि सहकलाकारांना पाहायला मिळालं. रंगमंचावरील कलाकारदेखील घाबरले पण महादेवाची भूमिका करणाऱ्या पत्राने मात्र गळ्यात जिवंत नाग घालून संवाद म्हटले. सध्या या कलाकाराची आणि नाटकाचीच चर्चा अथणी तालुक्यात सुरू आहे.