AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fardeen Khan | अखेर फरदीन खान – नताशाच्या घटस्फोटामागचं कारण आलं समोर; जवळच्या मित्राकडून खुलासा

दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानने 2005 मध्ये नताशाशी लग्न केलं. या दोघांना डायनी ही मुलगी आणि अझेरियस हा मुलगा आहे. फरदीन त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकदा कुटुंबीयांसोबत, मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत असतो.

Fardeen Khan | अखेर फरदीन खान - नताशाच्या घटस्फोटामागचं कारण आलं समोर; जवळच्या मित्राकडून खुलासा
Fardeen Khan wife Natasha MadhvaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 8:15 AM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : अभिनेता फरदीन खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. फरदीनच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असून गेल्या वर्षभरापासून तो पत्नीपासून वेगळं राहत असल्याचं म्हटलं जात आहे. तब्बल 18 वर्षांच्या संसारानंतर फरदीन खान आणि नताशा माधवानी घटस्फोट घेणार असल्याचंही कळतंय. नताशा ही 70 च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर या दोघांमध्ये नेमकं कुठे आणि काय बिनसलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण समोर आलं आहे. फरदीन किंवा नताशाने याबद्दल अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांच्या एका मित्राने याविषयी मौन सोडलं आहे.

दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानने 2005 मध्ये नताशाशी लग्न केलं. या दोघांना डायनी ही मुलगी आणि अझेरियस हा मुलगा आहे. फरदीन त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकदा कुटुंबीयांसोबत, मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत असतो. कुटुंबीयांवर असलेल्या प्रेमाबद्दलही तो अनेकदा मुलाखतींमध्ये व्यक्त झाला होता. आता फरदीनच्या एका जवळच्या मित्राने खुलासा केला आहे की त्या दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला नाही.

“फरदीन आणि नताशा यांच्यामध्ये मुलांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावरून खूप मोठं भांडण झालं होतं. फरदीनची इच्छा होती की मुलांनी मुंबईत शिक्षण पूर्ण करावं. तर नताशाच्या मते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दुबई योग्य आहे. या भांडणातून दोघं मध्यममार्ग काढू शकले नाहीत. याचमुळे सध्या नताशा मुलांसोबत लंडनमध्ये राहतेय, तर फरदीन मुंबईत आहे”, अशी माहिती फरदीनच्या जवळच्या मित्राने दिली.

हे सुद्धा वाचा

घटस्फोटाबद्दल तो पुढे म्हणाला, “विभक्त होण्याबद्दलचा निर्णय अद्याप दोघं करू शकले नाहीत. मात्र फिरोज खान यांच्या निधनानंतर दोघांमध्ये छोट्या-मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत.”

फरदीन आणि नताशाने डिसेंबर 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. नताशाने 2013 मध्ये मुलीला जन्म दिला. तर 2017 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. डायनी इसाबेला खान असं त्यांच्या मुलीचं नाव असून अझेरियस फरदीन खान असं मुलाचं नाव आहे. फरदीनने ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख झाली होती. त्याने फ्लाइटमध्ये नताशाला प्रपोज केलं होतं. लग्नाच्या आधी दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी.
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला.
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली.