रेखा यांचं मोठं वक्तव्य, ‘मी एक बदनाम…’, प्रेग्नेंसीबद्दल असं का म्हणाल्या? व्हाल थक्क
Rekha Personal Life: स्वतःच्याच खासगी आयुष्याबद्दल रेखा यांचं मोठं वक्तव्य, 'मी एक बदनाम...', प्रेग्नेंसीबद्दल देखील केलं होतं मोठं वक्तव्य, आज वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा जगत आहेत एकट्याच... खासगी आयुष्यामुळे असतात कायम चर्चेत...

Rekha Personal Life: एव्हर ग्रीन रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्यामुळे आयकॉनिक अभिनेत्री म्हणून रेखा यांची ओळख निर्माण झाली. आज रेखा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय विश्वापासून दूर आहेत. पण तरी देखील रेखा यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. अनेक मुलाखतींमध्ये रेखा यांनी त्यांच्या खासगी आणि प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं आहे. शिवाय बोयाग्राफीमध्ये रेखा यांनी स्वतःचा उल्लेख ‘बदनाम’ म्हणून केला होता. ज्यामुळे रेखा तुफान चर्चेत आल्या.
रेखा यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये अफेअर्सबद्दल सांगितलं होतं. रेखा यांची बायोग्राफी ‘ रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ यासिर उस्मान यांनी लिहिलं आहं. या पुस्तकात रेखा यांचे अनेक रहस्य उघड झाले आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती देखील नाही. पुस्तकात रेखा यांच्यासोबत घडलेल्या घटना लिहिण्यात आल्या आहेत.
रेखा स्वतःला म्हणाल्या होत्या बदनाम
स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल रेखा म्हणाल्या, ‘फक्त एक योगायोग आहे, ज्यामुळे मी कधीच प्रेग्नेंट राहिली नाही. मी फक्त एक अभिनेत्री नाही तर, एक बदनाम अभिनेत्री आहे. जिचा भूतकाळ फार वाईट आहे आणि सेक्स मॅनिएकची प्रतिमा आहे…’ रेखा स्वतःच्या बायोग्राफीमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.
दिग्गज अभिनेत्यांसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा…
रेखा यांचं नाव अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रेखा यांच्या नावाची चर्चा विनोद मेहरा, जीतेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत झाली. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
अनेकदा प्रेमात अपयश आल्यानंतर रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. मुकेश यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर रेखा यांनी पतीबद्दल अनेक वाईट गोष्टी माहिती झाल्या. अशात दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून रेखा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, घटस्फोट होण्याआधीच मुकेश यांनी स्वतःला संपवलं. पतीने स्वतःचं आयुष्य संपवल्यामुळे रेखा यांच्यावर अनेकांनी टीका केली. पण आता रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत. अनेक कार्यक्रमात रेखा खास अंदाजात पोहोचतात.