AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई – दक्षिण भारतात अभिनेत्रीची गडगंज संपत्ती; लाखो रुपये येतं भाडं; तिच्याकडे अब्जावधींची संपत्ती

कोट्यवधी रुपयांचं घर, महागड्या गाड्या आणि अब्जावधींची संपत्ती... बॉलिवूडमध्ये सक्रिय नसूनही अभिनेत्री कमावते अब्जावधींची माया... रेखा यांच्या संपत्तीवर बसणार नाही तुमचा विश्वास

मुंबई - दक्षिण भारतात अभिनेत्रीची गडगंज संपत्ती; लाखो रुपये येतं भाडं; तिच्याकडे अब्जावधींची संपत्ती
Updated on: Apr 19, 2023 | 4:40 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत. ज्या कायम त्यांच्या सौंदर्यामुळे आणि गडगंज संपत्तीमुळे चर्चेत असतात. काही अभिनेत्री तर बॉलिवूडमध्ये सक्रिय नसताना देखील कोट्यवधींची कमाई करतात. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीकडे कोट्यवधी नाही तर अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. बॉलिवूडच्या या श्रीमंत अभिनेत्रीचं नाव रेखा आहे. रेखा यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या चाहत्यांची संख्या जेवढी मोठी आहे, तेवढाच मोठा आकडा त्यांच्या संपत्तीचा देखील आहे. रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात पण आता रेखा त्यांच्याकडे असलेल्या गडगंज संपत्तीमुळे चर्चेत आल्या आहेत.

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा मोठ्या पडद्यापासून दूर असल्यातरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून रेखा कोणत्याच सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या नाहीत. पण तरी देखील त्या अत्यंत रॉयल आणि लग्जरी आयुष्य जगतात. चाहत्यांना कायम प्रश्न पडतो की, रेखा एवढं रॉयल आयुष्य कसं जगतात.

रेखा यांची संपत्ती फक्त मुंबईमध्ये नाही तर, दक्षिण भारतात देखील आहे. ज्यामुळे रेखा यांना प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांनी भाडं येतं. याशिवाय रेखा राज्यसभेच्या खासदारही आहेत. त्यामुळे दर महिन्याला त्यांना एक लाख रुपये मिळतात. शिवाय त्यांच्याकडे महागड्या गाड्या देखील आहे. रेखा मुंबईमध्ये भव्य बंगल्यात राहतात. रेखा यांच्या बंगल्याचं नाव ‘बसेरा’ असं आहे.

रेखा अभिनयापासून दूर असल्यातरी, टीव्ही शोमध्ये कायम दिसतात. ज्यासाठी त्या बक्कळ मानधन घेतात. शिवाय एखाद्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी देखील रेखा जास्त फी घेतात. जाहिरांतींच्या माध्यमातून देखील रेखा कोट्यवधींची माया कमावतात. गेल्या तीन दशकांपासून रेखा मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. रेखा यांची नेटवर्थ ४० मिलियन डॉलर म्हणजे, जवळपास २५ अब्ज रुपये आहे.

रेखा यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केलं. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी संपत्तीमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकतात. रिपोर्टनुसार रेखा यांच्याकडे वांद्रे याठिकाणी आलिशान बंगला आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास १३ कोटी रुपये आहे.

एवढंच नाही तर, रेखा यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ज्यांची किंमत हैराण करणारी आहे. रेखा यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. रेखा यांच्याकडे लँड रोव्हर डिस्कव्हरी, बीएमडब्ल्यू ३ सीरिज, Mitsubishi Outlander आणि टाटा नेक्सा यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. रेखा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर रेखा यांच्याकडे ४० मिलियन डॉलर म्हणजे २५ अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

त्यांनी आधी साईबाबांचा DNA दाखवा, आधी वादग्रस्त वक्तव्य, आता म्हणताय.
त्यांनी आधी साईबाबांचा DNA दाखवा, आधी वादग्रस्त वक्तव्य, आता म्हणताय..
सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गृहमंत्रालयावर गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गृहमंत्रालयावर गंभीर आरोप.
महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार
महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश.
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर.
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य.
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?.
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया.
अनिल पवारांची शिफारस केली होती? दादा भुसेंची मोठी प्रतिक्रिया
अनिल पवारांची शिफारस केली होती? दादा भुसेंची मोठी प्रतिक्रिया.