अजय देवगण याच्यामुळे आजही तब्बू जगते एकटं आयुष्य; अभिनेता मात्र कुटुंबासोबत आनंदी

'अजय देवगणला आज खूप पश्चाताप होत असेल...', असं का म्हणाली तब्बू... सर्वकाही असूनही अभिनेत्यामुळे आयु्ष्यभर एकटी राहिली अभिनेत्री... अजय आणि तब्बू यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात...

अजय देवगण याच्यामुळे आजही तब्बू जगते एकटं आयुष्य; अभिनेता मात्र कुटुंबासोबत आनंदी
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 11:57 AM

Tabu Ajay Devgan Relation : अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू याच्या ऑनस्क्रिन जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आजही दोघांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र तब्बू आणि अजय यांच्या नात्याची चर्चा होती. तब्बू हिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं, पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आज वयाच्या ५२ व्या वर्षी देखील अभिनेत्रीकडे सर्वकाही असून एकटी आयुष्य जगते. यासाठी अभिनेता अजय देवगण कारणीभूत आहे… असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं. एका मुलाखतीत तब्बू हिला लग्न न करण्याचं कारण विचारलं होतं. त्यानंतर तब्बूने मोठा खुलासा करत अजय देवगण याला जबाबदार ठरवलं.

तब्बू आणि अजय यांच्यामध्ये देखील खास नातं होतं. एक काळ असा होता, जेव्हा तब्बू आणि अजय एकमेकांना डेट करत होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. त्यानंतर अयज याने अभिनेत्री काजोल हिच्यासोबत लग्न केलं. काजोल हिच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेता आज त्याच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण तब्बू मात्र आजही एकटी आहे.

अद्यापही लग्न न झाल्याचं कारण सांगत तब्बूने मुलाखतीत अजय याला जबाबदार ठरवलं आहे. जेव्हा तब्बू लहान होती, तेव्हा अजय तिच्या शेजारी राहायचा. तब्बूचा भाऊ समीर आणि अजय तिच्यावर पाळत ठेवून असायचे. जर कोणता मुलगा तब्बूच्या जवळ यायचा प्रयत्न करायचा, तर समीर आणि अजय त्या मुलाला धमकी द्यायचे.

हे सुद्धा वाचा

म्हणून अद्याप एकटी असल्याचं तब्बू हिने सांगितलं. एवढंच नाही तर, पुढे मुलाखतीत तब्बू म्हणाली, ‘या गोष्टीसाठी अजय देवगणला आज खूप पश्चाताप होत असेल…’ या मोठ्या वक्तव्यामुळे तब्बू तुफान चर्चेत आली होती. हे वक्तव्य अभिनेत्री विनोदी अंदाजात जरी केलं असलं, तरी त्याची चर्चा मात्र तुफान रंगली. आजही तब्बू तिच्या खासगी आयु्ष्यामुळे कायम चर्चेत असते.

तब्बूने अनेकदा अजय याच्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तब्बू एका मुलाखतीत म्हणाली, ‘अजय देवगण असा एकमेव व्यक्ती आहे, ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते.’ दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांना अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली.

‘विजयपथ’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’ , ‘दे दे प्यार दे’ आणि ‘दृश्यम 2’ यांसारख्या अनेक सिनेमांध्ये अजय आणि तब्बू यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील दोघांच्या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. आजही अजय आणि तब्बू यांच्या सिनेमांच्या आणि त्यांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.