Ranbir Alia Wedding: हे असं लग्न लावणं चेष्टा नाय, मंडळी! धाडस लागतं.. धाडस

Ranbir Alia Wedding in Kolkata style: म्हणजे मंडळी ही बातमी कळल्यानंतर तुम्ही कौतुक करायचं, टोमणे मारायचे की बुद्धीची कीव करायची, हे तुमचं तुम्हीच ठरवा. कारण बातमी आहेच इंटरेस्टिंग! फक्त त्यावर रिऍक्ट कसं व्हायचं, याचं स्वातंत्र तुमच्याकडे अबाधित आहे.

Ranbir Alia Wedding: हे असं लग्न लावणं चेष्टा नाय, मंडळी! धाडस लागतं.. धाडस
replica wedding of Ranbir Kapoor and Alia Bhatt Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 2:14 PM

म्हणजे मंडळी ही बातमी कळल्यानंतर तुम्ही कौतुक करायचं, टोमणे मारायचे की बुद्धीची कीव करायची, हे तुमचं तुम्हीच ठरवा. कारण बातमी आहेच इंटरेस्टिंग! फक्त त्यावर रिऍक्ट कसं व्हायचं, याचं स्वातंत्र तुमच्याकडे अबाधित आहे. त्यामुळे नेमकं तुम्हाला ही बातमी कळल्यानंतर काय वाटतंय, हे सांगायला विसरु नका! त्याचं झालं असं, की बॉलिवूड स्टार आणि कपूर खानदाराचे सुपुत्र रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा शुभविवाह बॉलिवूड स्टार आणि भट कुटुंबातील सुकन्या आलिया (Alia Bhatt) हिच्यासोबत यशासांग पार पडला. दोन्ही कुटुंबात लग्नाचा उत्साह होता. आनंद होता. लग्नाची गडबड होती. यजमानी पाहुण्यांची उठबस करण्यास व्यस्त होती. एकीकडे या सगळ्याचा उत्साह असताना दुसरीकडे कोलकातामध्येही (Kolkata) लग्नाचा तोच उत्साह, तोच आनंद आणि तिच लगबग पाहायला मिळाली.

कोलकातमध्ये आलिया-रणबीरच्या लग्नाची रेप्लिका

कोलकात्यातही आलिया-रणबिरचा लग्नसोहळा पार पडला. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची प्रतिकृती कोलकात्यात हुबेहुब साकारण्यात आली. या लग्नाचीही चर्चा रणबीर आणि आलियाच्या खऱ्याखुऱ्या लग्नाइतकीच होती. कोलकात्यात पाली दुर्गोत्सव समितीकडून या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. करीना करीश्माही करवली म्हणून हजर होता. कोलकात्यातील बंगाली स्टाईल धुमधडाक्यात देवाब्राम्हणांच्या साक्षीनं आलिया आणि रणबीरचं लग्न थाटामाटत पार पडलं.

या संपूर्ण सोहळ्यासाठी खास लग्नाचा मांडव टाकण्यात आला होता. भटजी बुवांना बोलवण्यात आलं हो. करीना-करीश्मा यांचीही हजेरी या लग्नाला होती. बंगाली पद्धतीनं आलिया आणि रणबीरं पारंपरिक पद्धतीनं यावेळी लग्न लावलं गेलं.

बॉलिवूडमधील स्टार्सचे चाहते त्यांच्यासाठी काय करतील, याचा काहीही नेम नाही. चाहत्यांसाठी काहीही करणारे चाहते भारतानं याआधीही पाहिलेले आहेत. या लग्नाच्या निमित्तानं पुन्हा पाहिले गेले. आणि जो पर्यंत सिनेमा बनतोय, तो पर्यंत भारतात पाहायला मिळणाच, याची खात्री या रेप्लिका लग्नानं पुन्हा एकदा सगळ्यांना पटली असेल, हे नक्की!

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding Photos: घरातल्या ‘त्या’ आवडत्या जागीच रणबीर-आलियाने बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचे खास फोटो

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding: लग्नानंतर ‘मिस्टर अँड मिसेस कपूर’चा रोमँटिक अंदाज

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.