Bollywood Drugs Case | “होय, मी ड्रग्ज घेतलं” रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली

एनसीबीच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीकडून ड्रग्ज सेवन केल्याची कबुली.एनसीबीने विचारलेल्या 55 व्या प्रश्नाचे उत्तर देताना रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली

Bollywood Drugs Case | होय, मी ड्रग्ज घेतलं रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली
Follow us
| Updated on: Sep 21, 2020 | 2:18 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर पुढील तपास एनसीबीकडे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ) सोपवण्यात आला आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह अन्य आरोपींना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. आता एनसीबीच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीने ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. ( Rhea Chakraborty admits Drugs Consumption)

एनसीबीने विचारलेल्या 55 व्या प्रश्नाचे उत्तर देताना रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. एनसीबी अधिकाऱ्यांनी “जर तू ड्रग्जचे सेवन करत नसशील, तर तू ड्रग्ज तस्कर आहेस आणि हाही एक भयंकर गुन्हाच आहे” असे दटावल्यानंतर रियाने आपण ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली, असे वृत्त रिपब्लिक वाहिनीने दिले आहे. ही माहिती लपवण्यासाठी आपल्या टीमनेच सांगितल्याचा दावा रियाने चौकशीत केला.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 22 सप्टेंबरपर्यंत भायखळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ड्रग्ज कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील 25 कलाकारांची यादी दिल्याची धक्कादायक माहिती आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील बडी नावंही समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रख्यात अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावं एनसीबीच्या चौकशीत आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने घेतल्याचा दावा केला जात आहे.

रिया चक्रवर्तीचा मुंबई सेशन कोर्टात जामीन अर्ज

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने यापूर्वी जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. “आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,” असं तिने आपल्या जामीन अर्जात म्हटलं  होतं.

NCB च्या गळाला बडा मासा

सुशांत सिंग ड्रग्स प्रकरणात अटक आरोपी अंकुश अरनेजा याच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी राहील रफत विश्राम उर्फ सॅम याला अटक करण्यात आली आहे.सॅम हा फिल्म क्षेत्रातील अनेकांना ड्रग्स देत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

( Rhea Chakraborty admits Drugs Consumption)

संबंधित बातम्या 

ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाकडून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे, सारा अली खान आणि रकुल प्रीत NCB च्या रडारवर?

Rakul Preet : रियाच्या चौकशीत ड्रगप्रकरणात नाव, आता रकुलप्रीत सिंहची हायकोर्टात धाव

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.