AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावाला समजले बॉयफ्रेंड; पापाराझीच्या कमेंटवर भडकली रिया चक्रवर्ती, पहा व्हिडीओ

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत आयरा खानच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. यावेळी तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. पोझ देताना एका फोटोग्राफरने 'नाईस जोडी' अशी कमेंट केली. त्यावर रिया चांगलीच भडकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भावाला समजले बॉयफ्रेंड; पापाराझीच्या कमेंटवर भडकली रिया चक्रवर्ती, पहा व्हिडीओ
Rhea Chakraborty with brotherImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 10:48 AM

मुंबई : 15 जानेवारी 2024 | अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने नुकतंच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्न केलं. मुंबईत या दोघांनी आधी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. या लग्नानंतर मुंबईत जंगी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. धर्मेंद्र, सलमान खान, अनिल कपूर, हेमा मालिनी, रेखा यांसह नवोदित कलाकारांचीही हजेरी होती. या रिसेप्शनला अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या भावासोबत पोहोचली होती. पापाराझींसमोर तिने भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले. मात्र यावेळी असंकाही घडलं, जे ऐकल्यानंतर रियाने पापाराझींना चांगलंच सुनावलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझी अकाऊंटवर रिया आणि शौविकचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये रिया तिच्या भावासोबत पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देते. यावेळी नेहमीप्रमाणे पापाराझी त्यांना राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट पोझ देण्यासाठी सांगतात. त्याचवेळी एक फोटोग्राफर रियाला म्हणतो, ‘चांगली जोडी आहे.’ हे ऐकल्यानंतर त्याच्या बाजूला उभा असलेला फोटोग्राफर त्याला सांगतो की हा रियाचा भाऊ आहे. आपली चूक समजताच संबंधित फोटोग्राफर रियाची लगेच माफी मागितली.

हे सुद्धा वाचा

रिया आधी फोटोसाठी शांतपणे पोझ देते. ‘चांगली जोडी’ ही कमेंट ऐकल्यानंतरही ती संयम ठेवते. त्यानंतर तिथून निघताना ती पापाराझींना सुनावते की, “अशा लोकांमुळेच अफवा पसरतात.” रियाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतवरूनही कमेंट्स केल्या आहेत. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या निधनानंतर रियाच्या आयुष्यात असंख्य चढ-उतार आले. इतकंच नव्हे तर तिला अटकसुद्धा झाली होती. या अटकेनंतर ती जवळपास सहा आठवडे भायखळा तुरुंगात होती.

पहा व्हिडीओ

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा आहे. रिया ही बंटी सजदेहला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. बंटी हा सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही अभिनेता, दिग्दर्शक सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. बंटी हा कॉर्नरस्टोन या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा सीईओ आहे. ही टॅलेंट कंपनी क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्ससोबत काम करते. बंटीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहली, के. एल. राहुल. हार्दिक पांड्या, युवराज सिंग यांसारख्या क्रिकेटर्ससोबतचे फोटो पहायला मिळतात. त्याचसोबत काही बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचेही बंटीचे फोटो आहेत.

आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.