Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Chakraborty : ‘भूक लागली होती पण, दिलेल्या पदार्थांमध्ये…’, रिया चक्रवर्ती हिने सांगितलं तुरुंगातील भयानक वास्तव

Rhea Chakraborty : सुशांत राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती हिने भोगला तुरुंगवास, तुरुंगातील सुरुवातीचे 14 दिवस होते अत्यंत भयानक, अभिनेत्रीला भूक लागायची पण मिळणारं अन्न म्हणजे... सध्या सर्वत्र रिया चक्रवर्ती हिने सांगितलेल्या अनुभवाची चर्चा...

Rhea Chakraborty : 'भूक लागली होती पण, दिलेल्या पदार्थांमध्ये...', रिया चक्रवर्ती हिने सांगितलं तुरुंगातील भयानक वास्तव
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 8:56 AM

मुंबई | 15 जानेवारी 2024 : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. सुशांत याच्या निधनांतर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी रिया हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे रिया हिला तुरुंगवास देखील भोगावा लागला. रिया हिने तुरुंगात आलेले अनुभव याआधी देखील अनेकदा सांगितले, पण आता अभिनेत्रीने तुरुंगातील 14 दिवस, मिळत असलेलं अन्न आणि तुरुंगातील टॉयलेटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रिया हिने तुरुंगातील भयानक अनुभव सांगितला आहे.

रिया चक्रवर्ती हिचे तुरुंगातील 14 दिवस

रिया हिला 2020 मध्ये तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. तेव्हा सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवला होता. अभिनेत्री म्हणाली, ‘कोरोना नियमांमुळे मला 14 दिवस एकटीला एका ठिकाणी ठेवलं होतं. मला विचारण्यात आलं जेवण हवं आहे का? मला प्रचंड भूक लागली होती आणि मी थकलेली देखील होती.. पण मला जे मिळालं तेव्हा मी ते गप्प खाल्ल…’

पुढे रिया हिला जेलमध्ये काय खायची? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘पोळी आणि शिमला मिरचीची भाजी होती. भाजीवर पाणी तरंगत होतं. पण मला काहीही फरक पडला नाही. जे मिळालं ते गप्प खाल्ल…  घरुन 5 हजार रुपये मनी ऑर्डर मिळायचे… त्यामध्येच सर्वकाही पाहावं लागत होतं. मिळणाऱ्या पैशांनी मी तुरुंगात पाणी खरेदी केलं…’

हे सुद्धा वाचा

‘पाण्यामध्येच 2500 रुपय खर्च व्हायचे. सकाळी 6 वाजता नाश्ता, दुपारचं जेवण सकाळी 11 वाजता आणि रात्रीचं जेवण दुपारी दोन वाजता मिळायचं. कारण ब्रिटिश नियमांनुसार सर्वकाही होतं. सकाळी 6 वाजता तुरुंगाचे दरवाजे उघडाचे आणि संध्याकाळी 5 वाजता बंद व्हायचे. याच वेळत अंघोळ, ग्रंथालयात जायची परवानगी होती. अशात अनेक महिला त्यांचं जेवण रात्रीसाठी ठेवायचे आणि 7 – 8 वाजता खायचे…

तुरुंगातील टॉयलेटबद्दल रिया म्हणाली…

‘तुरुंगातील सर्वात कठीण दिवसांपैकी हा टप्पा प्रचंड भयानक आहे. ज्याठिकाणी झोपायचे, त्याच ठिकाणी अगदी जवळ टॉयलेट असतात. मानसिक धक्का इतका मोठा होत्या त्याच्यासमोर शारीरिक धक्का देखील फिका वाटायचा… घाणेरडं वॉशरुम देखील सहण करेल… तेव्हा असे विचार असायचे…’ सुशांत यांच्या निधनानंतर अनेक यातना भोगल्यानंतर रिया आज आनंदी आयुष्य जगत आहे.

शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.