Rhea Chakraborty | “काय वाटलं मी घाबरून जाईन?”; सुशांतच्या निधनाच्या 3 वर्षांनंतर रिया चक्रवर्तीचं कमबॅक

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचं नाव समोर आलं होतं. या दोघांना अटकही झाली होती.

Rhea Chakraborty | काय वाटलं मी घाबरून जाईन?; सुशांतच्या निधनाच्या 3 वर्षांनंतर रिया चक्रवर्तीचं कमबॅक
Rhea ChakrabortyImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 3:21 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अभिनेत्री आणि एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं गेलं. सुशांतच्या कुटुंबीयांनीही रियावर गंभीर आरोप केले होते. या सर्व घटनेच्या तीन वर्षांनंतर अखेर रियाने कमबॅक केलं आहे. एमटीव्हीच्या प्रसिद्ध ‘रोडीज 19’ या शोमध्ये ती गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयीची माहिती खुद्द रियाने दिली आहे. रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची धमाकेदार एण्ट्री पहायला मिळतेय.

या व्हिडीओमध्ये रिया म्हणते, “तुम्हाला काय वाटलं, मी परत येणार नाही? मी घाबरून जाईन? घाबरण्याची वेळ आता दुसऱ्यांची आहे. भेटुयात ऑडिशन्सला.” रिया पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे, हे या व्हिडीओतून पहायला मिळतंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रियाचं कमबॅक पाहून एकीकडे तिचे चाहते आणि शुभचिंतक खुश झाले आहेत. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतचे चाहते तिच्यावर भडकले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘मला रोडीज हा शो आवडतो, पण आता रियामुळे तो पाहणं बंद करणार आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘रोडीजवाल्यांचं डोकं फिरलंय का? त्यांनी हिला का घेतलं’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. ‘सर्वजण या शोसाठी खूप उत्सुक होते. पण निर्मात्यांनी हिचा चेहरा दाखवून सर्वांचा मूड खराब केला’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. रोडीजचा शो फ्लॉप ठरणार, अशीही टीका काहींनी केली आहे.

आता रिया चक्रवर्तीमुळे रोडीजचा टीआरपी वाढणार की कमी होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रियाशिवाय या शोमध्ये प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी हेसुद्धा गँग लीडर असणार आहेत. त्याचप्रमाणे रणविजय सिंघा आणि सोनू सूदसुद्धा या शोमध्ये सहभागी होणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by MTV Roadies (@mtvroadies)

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचं नाव समोर आलं होतं. या दोघांना अटकही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर रिया बरेच दिवस माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. काही दिवसांपूर्वी रिया तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आली होती. ती बंटी सजदेहला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.

कोण आहे बंटी सजदेह?

बंटी हा रिॲलिटी स्टार आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. स्पोर्ट्स आणि एंटरटेन्मेंट क्षेत्रातील एका मोठ्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा तो मालक आहे. काही वर्षांपूर्वी रियासुद्धा त्याच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची एक क्लाएंट होती, अशी माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपासून बंटी आणि रिया एकमेकांना डेट करत असल्याचं कळतंय.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.