Tandav | ‘तांडव’च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल!

अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली वेब सीरिज तांडव (Tandav) गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Tandav | 'तांडव'च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल!
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 4:43 PM

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली वेब सीरिज ‘तांडव’ (Tandav) गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने तांडव टीमला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तांडव टीमला दिलासा न मिळाल्याबद्दल ऋचाने नाराजी व्यक्त केली असून कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. (Richa Chadda reacts to the Supreme Court’s verdict in the Tandav web series case)

‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर, अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशु मेहरा आणि ‘तांडव’चे लेखक गौरव सोळंकी आणि अभिनेता मोहम्मद झिशान अयुब या सर्वांकडून सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या तिन्ही याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपाठासमोर सुनावणी झाली होती.

त्यावेळी न्यायालयाने या सर्वांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. आम्ही कलम 482 CrPC अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करु शकत नाही. त्यामुळे आम्ही अंतरिम संरक्षण बहाल करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले होते.

या वेब सीरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान राम यांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. ‘तांडव’मधील एका दृश्यात ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी त्वरित अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या अधिकाऱ्यांना बोलावले. भाजपच्या अनेक नेत्यांनी ‘तांडव’विरोधात आंदोलन करून, वेब सीरीजवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी केली होती.

संबंधित बातम्या : 

विकी कौशलने घेतली कतरिनाची गळाभेट, कॅमेरामुळे गुपित झाले उघड!

ऐतिहासिक क्षणांचा चित्रपट ’83’ होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Confirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा!

(Richa Chadda reacts to the Supreme Court’s verdict in the Tandav web series case)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.