दागिन्यांच्या सुरक्षेसाठी होता स्वतंत्र माणूस, बप्पी दांच्या सोन्याचे पुढे काय होणार?

प्रसिध्द संगीतकार, गायक बप्पी लाहिरी यांचे आज (बुधवारी) निधन झाले. आपल्या संगीतासोबतच आपल्या दाग-दागिन्यांसाठी प्रसिध्द असलेल्या बप्पी लाहिरी यांच्या निधनानंतर एक प्रश्‍न नक्कीच निर्माण होतोय, तो म्हणजे त्यांच्या दागिन्यांचे काय होणार? याबाबत नुकताच एक निर्णय घेण्यात आला आहे.

दागिन्यांच्या सुरक्षेसाठी होता स्वतंत्र माणूस, बप्पी दांच्या सोन्याचे पुढे काय होणार?
बप्पी दांचं सोनं कुणाला मिळणार?
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:47 PM

मुंबई : ‘तमा, तमा लोगे’, ‘यार बिना चैन कहां रे’ पासून ते आताचे ‘ऊ ला ला’पर्यंत अशा अनेक गाण्यांनी रसिकांना (Hindi Songs) ठेका धरायला लावणारे बप्पी लाहिरी (Bappi lahiri) यांचे आज निधन झाले. बप्पी दा जसे आपल्या गाण्यांनी प्रसिध्द होते तितकेच ते त्यांच्या अंगभर सोन्याच्या दागिन्यांनीदेखील ओळखले जात होते. बप्पी दा व सोनं (Gold) हे एक अतूट नातं होते. भारतीय संस्कृतीत साधारणत: महिलांना सोन्याचे अधिक आकर्षण असते. परंतु बप्पी दा यांचे एखाद्या महिलेपेक्षाही अधिक आपल्या सोन्यावर तसेच आपल्या दागिन्यांवर नितांत प्रेम होते. त्याच्या निधनानंतर साहजिकच त्यांच्या सोन्याचे काय होणार? असा प्रश्‍न अनेकांकडून विचारला जात आहे. बप्पी दा यांची अशी भावना होती की, जेव्हा-जेव्हा त्यांना सोनं दिल जायच तेव्हा-तेव्हा त्यांना ते लकी ठरत गेलं व त्यांच्याकडून एकाहून एक हिट गाणी (Song) गायली गेली आहे.

स्वत: घ्यायचे काळजी

दरम्यान, ‘इंडिया टुडे’ने बप्पी लाहिरीच्या एका जवळच्या सूत्राकडून त्यांच्या सोन्याबद्दल माहिती मिळवली असता त्यांनी सांगितले की, बप्पी लाहिरी हे नेहमी आपल्या दागिन्यांना अतिशय सुरक्षित एका काचेच्या कपाटात ठेवत असते. बप्पी दा स्वतः त्याची नेहमी साफसफाई करून त्याला सांभाळत असत. बप्पी दांच्या एका मित्राने सांगितले की, सोन्यासोबतचे त्यांचे नाते अतूट होते. सोने हा त्यांच्यासाठी केवळ एक आभूषणाचा विषय नव्हता. त्यांचे सोन्यासोबत एक वेगळे असे घट्ट नाते होते.

सोन्याने दिला ‘सिग्नेचर लूक’

बप्पी लाहिरी हे त्यांच्या संगीतामुळे तर प्रसिध्द होतेच परंतु त्या काळात त्यांना एक विशेष ओळख दिली ती त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांनी. स्वत: बप्पी दांच्या मते त्यांना सोन्यानेच हा सिग्नेचर लूक मिळाल्याचे ते सांगत. बप्पी दा हे पश्चिमेकडील हिप-हॉप आणि R&B संगीताने खूप प्रभावित होते. ‘रॅपर्स’ना झगमगाट व हिऱ्यांबद्दल विशेष आकर्षण असते. बप्पी लाहिरी यांनी स्वतःला हॉलीवूडचे संगीतकार आणि डॉ ड्रे आणि इतर हिप-हॉप कलाकारांसारख्या दिग्गज निर्मात्यांच्या यादीतमध्ये समाविष्ट होते, जे चमचमत्या हिऱ्याच्या साखळ्या घालत असत. बप्पी लाहिरी यांचा स्वतःचा खास विश्‍वासू असा मदतनीस होता जो त्यांच्या सोन्याचे रक्षण करत असे. या सर्व सोन्याच्या दागिन्यांची वैयक्तिक यादी तो ठेवत असे. रिपोर्ट्सनुसार, बप्पी दा आपल्या रॉयल्टी कमाईतून सोने खरेदी करत असे. सोन्याशी त्यांचे नाते आध्यात्मिक होते.

…तेव्हा सेलिब्रिटींनाही म्हटले ‘ना’

सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक वेळा सेलिब्रिटी आणि चाहते बप्पी लाहिरींकडे त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसोबत फोटो काढण्याची परवानगी मागायचे. तेव्हा बप्पी दा त्यांना अगदी विनम्रपणे नाही म्हणून सांगत असत. यातून त्यांचे त्यांच्या सोन्याप्रती असलेले प्रेम स्पष्ट दिसून येते. ‘त्याच्या दागिन्यांना कोणी हात लावलेला त्याला आवडत नव्हता. जे त्याला भेटायला यायचे किंवा त्याच्या पाया पडायचे त्यांना बप्पी दा आपल्यापासून अंतर ठेवायचा प्रयत्न करायचे. बप्पी दांनी इतक्या वर्षांत सोन्याची साखळी, अंगठी, ब्रेसलेट, गणपतीची मूर्ती, हिऱ्यांनी जडवलेल्या आकर्षक बांगड्या, सोन्याची फ्रेम बनवली आहे. हे सर्व दागिने काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहेत.

दागिन्यांचे होणार जतन

कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने सांगितले की, बप्पी दा यांचा मुलगा बप्पा आणि मुलगी रीमा यांनी त्यांच्या वडिलांचे सोने जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वडिलांचा वारसा असाच कायम ठेवण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. बप्पी दा रोज घालत असलेली चेन आणि अंगठी एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवत, जी बप्पी दा नेहमी सोबत ठेवत. याशिवाय बप्पी दा यांना त्यांच्या चाहत्यांकडून आणि गायणानिमित्त अनेकदा सोन्याच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. हे सर्व आता वारसा म्हणून जतन केले जाणार आहे.

बप्पी लाहिरी यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची रीघ, बप्पी दा यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा

Bappi lahiri passed away : सोनेरी आवाजाचे धनी बप्पी लाहिरी यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या…

Bappi Lahiri Death | बॉलिवूडचा ‘डिस्को किंग’ बप्पी लाहिरी यांची ‘गोल्ड मॅन’ म्हणून कशी झाली ओळख?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.