Rajiv Kapoor | कपूर कुटुंबावर पुन्हा शोककळा, राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 58 वर्षीय राजीव यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीव कपूर यांना इनलिंक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Rajiv Kapoor | कपूर कुटुंबावर पुन्हा शोककळा, राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
राजीव कपूर
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 2:19 PM

मुंबई : ‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटांतून प्रसिद्ध झालेले अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे मंगळवारी (9 फेब्रुवारी) निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 58 वर्षीय राजीव यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीव कपूर यांना इनलिंक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूरही रुग्णालयात आले होते. लाखो प्रयत्न करूनही डॉक्टर राजीव यांचा जीव वाचवू शकले नाहीत (Rishi Kapoor’s younger brother Rajiv kapoor passes away).

अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आणि म्हणाला, ‘मी माझा छोटा भाऊ गमावला आहे. राजीव आता या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना वाचवता आले नाही.’ रणधीर यांनी असेही म्हटले आहे की, ते आता आपल्या भावाच्या पार्थिवाची वाट पाहत आहे.

नीतू कपूर यांची पोस्ट

राजीव कपूर यांचा फोटो शेअर करताना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांनी ‘रेस्ट इन पीस’, असे म्हटले आहे.

(Rushi Kapoor’s younger brother Rajiv kapoor passes away)

तीन कपूर भावांमध्ये राजीव हेसर्वात लहान आहेत. गेल्या वर्षीच ऋषी कपूर यांचे निधन झाले होते, त्यामुळे या दुःखातून कपूर कुटुंब अद्याप सावरलेले नव्हते आणि आता राजीव यांच्या मृत्यूमुळे कपूर कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

राजीव कपूर यांची कारकीर्द

राजीव कपूर यांनी आपल्या करिअरची सुरूवात ‘जिम्मेदार’ या चित्रपटातून केली होती. तथापि, त्यांना खरी ओळख राज कपूर दिग्दर्शित 1985मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मिळाली. चित्रपटात राजीव यांच्यासोबत अभिनेत्री मंदाकिनी मुख्य भूमिकेत झळकली होती. या दोघांनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. यानंतर ते आणखी काही चित्रपटांमध्ये झळकले होते.

अभिनयात यश न मिळाल्यानंतर राजीव यांनी पुन्हा निर्माता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तसेच ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट राजीव कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनी ‘हिना’ आणि ‘आ अब लौट चले’ यासारख्या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.

(Rushi Kapoor’s younger brother Rajiv kapoor passes away)

हेही वाचा :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.