बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखला मोठा धक्का, म्हणाला, माझ्याकडे…

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. रितेश देशमुख हा सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट करताना रितेश देशमुख हा दिसला. आता रितेश देशमुख याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखला मोठा धक्का, म्हणाला, माझ्याकडे...
Baba Siddiqui and Riteish Deshmukh
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 12:52 PM

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट करताना दिसला. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या गोळीबाराबद्दल कळताच सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी लीलावती रूग्णालयात धाव घेतली. बाबा सिद्दीकी हे कायमच बॉलिवूड कलाकारांच्या जवळ असत. खास पार्टीचे आयोजन त्यांच्याकडून गेले जात. हेच नाही तर सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील वाद देखील त्यांनीच मिटवला होता. 

बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर रितेश देशमुख यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर रितेश हैराण झालाय. आता रितेशची पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय.

रितेश देशमुख याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर मला अत्यंत दु:ख झाले असून मोठा धक्का बसलाय. दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. या अत्यंत कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला धीर मिळो. ज्यांनी कोणी हा गुन्हा केलाय त्यांना कटघऱ्यामध्ये उभे करावे, असे रितेशने म्हटले. 

आता रितेश देशमुख याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. लोक रितेशच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून बाबा सिद्दीकी यांना श्रद्धाजंली वाहताना दिसत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर बॉलिवूड हादरल्याचे बघायला मिळतंय. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे बघायला मिळतंय.

बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची संपूर्ण जबाबदारी ही बिश्नोई गँगकडून घेण्यात आलीये. तशी एक पोस्ट देखील बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. हेच नाही तर आपली आणि बाबा सिद्दीकीची कोणतीही दुश्मनी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. सलमान खान आणि दाऊद इब्राहिमच्या जवळ असल्याने हत्या करण्यात आल्याचे बिश्नोई गँगकडून पोस्टमध्ये सांगण्यात आले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.