रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’चं शुटिंग, नदीत बुडालेल्या सेलिब्रिटीचा मृत्यू
Ritesh Deshmukh: रितेश देशमुखच्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक दुर्दैवी अपघात, नदीत बुडालेल्या सेलिब्रिटीचं निधन, मृत्यूच्या दोन दिवसांनंतर..., 'राजा शिवाजी' सिनेमाची शुटिंग थांबवली, सेटवर शोककळा पसरली...

Ritesh Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखच्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक दुर्दैवी अपघात झाला आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमातील डान्सर सौरभ शर्मा याचं निधन झालं आहे. सिनेमाच्या शुटिंग सुरु असताना सौरभ गायब झाला. त्यानंतर दोन दिवसांनंतर सौरभ याचा मृतदेह नदीमध्ये आढळल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. सौरभच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील संगम माहुली गावात सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं. शूटिंगमध्ये, सौरभ शर्मा एक डान्सर म्हणून गाण्याचा एक भाग होता. गाण्यात वेगवेगळ्या रंगांचे गुलाल उधळले जात होते. गाण्याचं शुटिंग संपल्यावर तो कृष्णा नदीत हात धुण्यासाठी गेला. नदीच्या जोरदार प्रवाहाची जाणीव नसताना, त्याने पोहण्यासाठी नदीत उडी मारली आणि तो वाहून गेला.




View this post on Instagram
थांबवली सिनेमाची शुटिंग
याबाबत तातडीने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह नदीत सापडला. या घटनेमुळे सिनेमाची शुटिंग सध्या थांबवण्यात आली आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात रितेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
रितेश देशमुखचे आगामी सिनेमे
रितेश देशमुखचे आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘रेड 2’ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अजय देवगण, तमन्ना भाटिया, सौरभ शुक्ला, वाणी कपूर, सुप्रिया पाठक, अमित सियाल आणि रजत कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
रितेश देशमुख सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. एवढंच नाही तर, रितेश आणि पत्नी जिनिलिया यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.