रॉकी और रानी की प्रेम कहानी : पिक्चर रणवीर- आलियाचा चर्चा मात्र दीपिका- रणबीरची; असं का ?

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : करण जोहरच्या 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका आहे. पण पोस्टर पाहून रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोणचीच चर्चा करत आहेत.

रॉकी और रानी की प्रेम कहानी : पिक्चर रणवीर- आलियाचा चर्चा मात्र दीपिका- रणबीरची; असं का ?
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 5:20 PM

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. चित्रपटांसोबतच तो गॉसिप्सचाही भाग आहे. आज त्याचा वाढदिवस असतो. करण पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. पण त्याच्या वाढदिवसामुळे नव्हे तर त्याच्या आगामी चित्रपटामुळे. करणच्या आगामी ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहेत. यामध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्टची (alia bhatt) वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे पोस्टर्स आकर्षक असून चित्रपट काहीसा वेगळा दिसतो. पण पोस्टर्सनी सोशल मीडिया यूजर्सना करणला ट्रोल करण्याचा मुद्दा दिला आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल नेटिझन्स बोलू लागले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाशी संबंधित अनेक फोटो शेअर केले आहेत. यासोबतच कॅप्शन लिहित चित्रपट कधी रिलीज होणार त्याची तारीखही नमूद केली आहे. यापूर्वी रणवीर आणि आलिया एका ट्रॅव्हल एजन्सीच्या जाहिरातीत एकत्र दिसले होते आणि त्यांनी ‘गली बॉय’मध्ये सोबत काम केलं होतं. काहींना त्यांची जोडी आवडली आहे. त्याच वेळी, काही युजर्सना मात्र ते दोघे एकत्र बिलकूल आवडले नाहीत.

आठवले दीपिका-रणबीर

चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच सर्वांना सगळ्यात आधी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची आठवण झाली. खरंतर दीपिका आणि रणबीर एकमेकांना डेट करत होते. मात्र आता ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असून दीपिकाने रणवीर सिंगशी तर रणबीरने आलिया भट्टशी लग्न केले आहे. अशा परिस्थितीत आलियाला दीपिकाच्या पतीसोबत पाहून लोकांना प्रश्न पडला आहे. असा प्रयोग फक्त करण जोहरच करू शकतो असे लोक म्हणत आहेत. अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘दीपिकाचा नवरा, रणबीरची बायको.’ तर दुसऱ्याने एकाने म्हटले, ‘मेक माय ट्रिपवर फिल्म बनवा.’, एकाने म्हटले, ‘ (हे पोस्टर पाहून) रणबीर कोपऱ्यात उभा राहून रडत आहे… अशा अनेक कमेंट्स येत असून बरेच जण चित्रपटातील जोडीला ट्रोल करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.