Video : ‘सजदे किए है लाखो…’ रितेश-जेनेलियानं साजरी केली रोमॅन्टिक होळी!

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यानेही होळीचा आनंद लुटला आहे. रितेश आणि जेनेलियाने अनोख्या अंदाजात होळी साजरी केली आहे.

Video : 'सजदे किए है लाखो...' रितेश-जेनेलियानं साजरी केली रोमॅन्टिक होळी!
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी खास अंदाजात होळीचा आनंद लुटला
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 8:15 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनावर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा स्थितीतही बॉलिवूडचे काही कलाकार कोरोना नियमांचं पालन करुन होळीचा आनंद घेताना पाहायला मिळाले. अनेक अभिनेते-अभिनेत्रींचे होळी साजरी केलेले फोटो समोर आले आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यानेही होळीचा आनंद लुटला आहे. रितेश आणि जेनेलियाने अनोख्या अंदाजात होळी साजरी केली आहे.(Romantic Holi of Riteish Deshmukh and Genelia D’Souza)

रितेश आणि जेनेलियाचा होळीचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही विविध रंगांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सजदे किए है लाखो या गाण्याच्या तालावर जेनेलिया रितेशवर फुलं फेकताना या व्हिडीओत दिसत आहे. तर शेवटी रितेश जेनेलियाच्या तोंडावर रंग लावताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना, ‘कोरोनाचे निर्बंध पाहता आपल्या पद्धतीने उत्सव साजरा करा. उत्सव छोटा आणि मर्यादित असला तरी त्याची भावना महत्वाची असते, होळीच्या शुभेच्छा’, असं जेनेलियाने म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण

रितेश आणि जेनेलिया यांनी 2003 मध्ये तुझे मेरी कसम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. लेखक मिलाप झवेरी आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी रितेश-जेनेलियाच्या जोडीला मस्ती चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर आणायचं ठरवलं.

डेटिंग करताना लग्नाचा सीन

दोघांनी 2002 मध्ये डेटिंग सुरु केलं आणि 2003 मध्येच सिनेमाच्या निमित्ताने का होईना, दोघांना लग्नाचा सीन करावा लागला. भविष्यात काय होईल, माहिती नाही, पण या क्षणाचा आनंद आपण घ्यायला हवा, असं जेनेलिया म्हणते. आम्ही तो सीन हसण्यावारी नेला, आणि पुढे गेलो, अशी आठवण रितेशने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितली होती.

संबंधित बातम्या :

Holi 2021 | पडद्यावर होळीची धूम माजवणारे ‘हे’ कलाकार प्रत्यक्षात मात्र रंगांपासून राहतात दूर!

Holi 2021 | ‘देसी गर्ल’ने परदेशात साजरी केली धमाल होळी, पती निकसह सासू-सासऱ्यांना लावला रंग!

Romantic Holi of Riteish Deshmukh and Genelia D’Souza

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.