RRR | ज्युनिअर एनटीआरचे बर्थडे सरप्राईज, पाहा ‘कोमाराम भीम’चा नवा जबरदस्त लूक

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) आज (20 मे) आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासमवेत ज्युनिअर एनटीआर लवकरच ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणार आहे.

RRR | ज्युनिअर एनटीआरचे बर्थडे सरप्राईज, पाहा ‘कोमाराम भीम’चा नवा जबरदस्त लूक
ज्युनिअर एनटीआर
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 12:42 PM

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) आज (20 मे) आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासमवेत ज्युनिअर एनटीआर लवकरच ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात एनटीआर ‘कोमारम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या वाढदिवशी निर्मात्यांनी चित्रपटातील त्याचा एक नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे (RRR New Poster Launch on Junior NTR birthday see his new look).

ज्युनिअर एनटीआरने आपल्या लूकचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, ‘तो मानाने बंडखोर आहे. हे प्रभावी पात्र साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते  आणि मी आपणा सर्वांसमोर माझे सर्वात मोठे आव्हान सदर करणार आहे.’ पोस्टरमध्ये ज्युनिअर एनटीआर हातात भाला धरलेला दिसत आहे.

पाहा पोस्टर

View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

ज्युनिअर एनटीआरचे हे नवे पोस्टर आरआरआरच्या चाहत्यांना खूपच आवडले आहे. लाखो लोकांनी याला लाईक केले आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करून चाहते त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत, या पोस्टरचे कौतुक करत आहेत.

वाढदिवसाच्या आधी चाहत्यांकडून मागितले गिफ्ट

वाढदिवसापूर्वी ज्युनिअर एनटीआरने चाहत्यांकडे खास भेटवस्तूची मागणी केली होती. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, या साथीच्या काळात, आपण मला देऊ शकत असलेली सर्वात मोठी भेट म्हणजे घरीच राहणे आणि स्थानिक लॉकडाऊन नियमांचे पालन करणे. यासह, त्यांनी गरजू लोकांना मदत करण्यास सांगितले आहे जेणेकरून आम्ही या साथीच्या रोगापासून लवकरात लवकर युद्ध जिंकू शकू.

आलिया भटची तेलगू चित्रपटात एन्ट्री

अजय देवगन सोबत आलिया भटनेही या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटात एन्ट्री केलीय. काही दिवसांपूर्वी RRR चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलिया भटचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केलं होतं. आलिया भटचा फर्स्ट लूकही तिच्या वाढदिवसाला म्हणजे 15 मार्च रोजी रिलीज केला होता. आलिया या चित्रपटात सीताची भूमिका बजावतेय.

RRR मधील स्टारकास्ट

आलिया भट RRRमध्ये राम चरणच्या आपोझिट भूमिका साकारत आहे. तर, ज्यूनिअर एनटीआर ओलिवियासह रोमांस करताना दिसत आहेत. आलिया भट, अजय देवगण, राम चरण, आणि ज्यूनिअर एनटीआरसह या चित्रपटात समुथिरकानी, ओलिविया मॉरिस, एलिसर डूडी आणि रे स्टीवनसनही प्रमुख भूमिकेत आहेत (RRR New Poster Launch on Junior NTR birthday see his new look).

दक्षिणेमध्ये ‘इतक्या’ कोटींना विकले गेले हक्क

निजाम – 75 कोटी रुपये

आंध्र प्रदेश – 165 कोटी रुपये

तामिळनाडू – 48 कोटी रुपये

मल्याळम – 15 कोटी रुपये

कर्नाटक – 45 कोटी रुपये

चांगला गल्ला जमवणार!

खास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

आणखी 200 कोटींचा करार

अशा परिस्थितीत पिंकविलाच्या अहवालानुसार एस.एस. राजामौली आणि जयंतीलाल गाडा यांच्यात नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्ससाठी विशेष करार झाला आहे. बॉलिवूड स्टुडिओने हिंदी डब सॅटेलाईट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक हक्क यासह सुमारे 200 ते 210 कोटी रुपयांच्या करारास अंतिम मान्यता दिली आहे. व्यापारिक स्त्रोतानुसार जयंतीलाल गडा यांनी हिंदी आवृत्तीच्या सॅटेलाईट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक हक्कांमध्ये 50% भागीदारी घेतली आहे. याचा अर्थ असा की, जर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींची कमाई केली, तर जयंतीलाल यांना थेट 50 कोटी मिळतील.

या चित्रपटाचे आतापर्यंतचे डील पाहता या हक्कांची किंमत 200 कोटी रुपये ठेवली गेली होती, परंतु नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स 140 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. राजामौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जाते आहे.

(RRR New Poster Launch on Junior NTR birthday see his new look)

हेही वाचा :

PHOTO | श्वेता तिवारीच्या समर्थनात राजा चौधरी पुढे आला, दोन्ही लग्न अयशस्वी होण्याबद्दल म्हणाला…

Photo : ‘आश्रम’ वेबसीरिजमधील ‘पम्मी’ अदिती पोहनकरचे ऑफस्क्रिन स्टायलिश फोटो

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.