RRR Review in Marathi: राजामौली.. सिर्फ नाम ही काफी है! रामचरण-ज्युनियर एनटीआरची ‘पॉवरपॅक्ड’ जुगलबंदी

Movie Review:  एस. एस. राजामौली... सिर्फ नाम ही काफी है! एखाद्या चित्रपटात कोणते कलाकार आहेत, त्याची कथा काय आहे, ट्रेलर कसा आहे, यांसारख्या गोष्टींचा अंदाज घेऊन आपण चित्रपट थिएटरमध्ये पहायचा की नाही हे ठरवतो. पण या सर्व गोष्टी बाजूला सारून प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यासाठी राजामौली (SS Rajamouli)  हे नावच पुरेसं आहे.

RRR Review in Marathi: राजामौली.. सिर्फ नाम ही काफी है! रामचरण-ज्युनियर एनटीआरची 'पॉवरपॅक्ड' जुगलबंदी
RRR Movie Review in MarathiImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 8:18 AM

Movie Review:  एस. एस. राजामौली… सिर्फ नाम ही काफी है! एखाद्या चित्रपटात कोणते कलाकार आहेत, त्याची कथा काय आहे, ट्रेलर कसा आहे, यांसारख्या गोष्टींचा अंदाज घेऊन आपण चित्रपट थिएटरमध्ये पहायचा की नाही हे ठरवतो. पण या सर्व गोष्टी बाजूला सारून प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यासाठी राजामौली (SS Rajamouli)  हे नावच पुरेसं आहे. ‘इगा’ (मख्खी), ‘मगधीरा’, ‘बाहुबली: द बिगनिंग’, ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ यांसारख्या लार्जर दॅन लाईफ चित्रपटांनंतर त्यांचा RRR चा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2017 मध्ये ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ प्रदर्शित झाला. त्यानंतर RRR हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्यामागे त्यांची पाच वर्षांची मेहनत आहे आणि ही मेहनत पडद्यावर दिसून येते. जवळपास 3 तास 6 मिनिटांचा हा चित्रपट आहे. हल्ली प्रेक्षकांना तीन तास थिएटरमध्ये खुर्चीला खिळवून ठेवणं दिग्दर्शकांसमोरचं मोठं आव्हान असतं. त्यातही तो कुठे रटाळ किंवा रेंगाळलेला वाटू नये याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. तर राजामौलींचा RRR तुम्हाला तीन तास खुर्चीला खिळवून ठेवू शकेल का आणि त्यामागची कारणं काय आहेत हे या रिव्ह्यूमार्फत जाणून घेऊयात..

चित्रपटाची कथा-

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेत राम हा पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतो, तर दुसरीकडे भीम हा अत्यंत साधा माणूस आहे. आग आणि पाणी या संकल्पनेवर या दोन व्यक्तीरेखा पडद्यावर फुलवल्या आहेत. राम हा आगीसारखा तापट, जिद्दी, शक्तीशाली आहे. ज्याच्या कामावर एकीकडे ब्रिटीश खूशही असतात आणि दुसरीकडे त्याच्या शक्तीशाली व्यक्तिमत्त्वाकडे पाहून भयभीतही होतात. भीम हा अत्यंत ताकदवान आहे, पण त्याच्या ताकदीचा वापर जेव्हा गरज असते, तेव्हाच तो करतो. लेडी स्कॉट ही स्वत:च्या स्वार्थासाठी मल्ली नावाच्या एका मुलीला तिच्या आई आणि कुटुंबापासून दूर नेते. तिला सोडवण्यासाठी भीम दिल्लीला येतो आणि तिथेच राम त्याला भेटतो. या दोघांची मैत्री कशी होते, मल्लीला सोडवण्यात भीमला यश मिळेल का, हे तुम्हाला चित्रपटात पहायला मिळेल. मात्र गोष्ट फक्त एवढीच नाही. यात अनेक ट्विस्ट आहेत, ड्रामा आहे, भरभरून अॅक्शन आहे, डान्स आहे, थोडीफार कॉमेडीही आहे. राजामौलींचा हा चित्रपट म्हणजे ‘फुल पॅकेज’ आहे.

प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात नेण्याचा प्रयत्न

चित्रपटातील भूमिका फक्त भूमिका न वाटता त्यामागील असलेली संकल्पना प्रेक्षकांना नीट समजावी, हा राजामौलींचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरतो. केवळ याच गोष्टीसाठी त्यांनी ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्या एण्ट्री सीनवर प्रचंड मेहनत घेतलेली पहायला मिळते. चित्रपटात वेळोवेळी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली पहायला मिळते, मात्र त्यावर आपण प्रश्न उपस्थित करू शकत नाही, कारण त्या त्या वेळी ती दृश्य आपल्याला थक्क करून जातात. ज्याप्रकारे त्यांनी ‘बाहुबली’मधून एक वेगळं विश्व प्रेक्षकांना दाखवलं. त्याचप्रकारे RRR हा सुद्धा प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या भूमिका. या दोघांनी साकारलेल्या भूमिकेचा आवाका मोठा नसला तरी त्यांनी या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे. आलिया आणि अजयच्या जागी इतर दाक्षिणात्य कलाकारसुद्धा घेतले जाऊ शकत होते, मग या दोघांचीच निवड का? तर यामागेही दिग्दर्शक म्हणून राजामौली यांचा एक वेगळा दृष्टीकोन आहे. अर्थात हा दृष्टीकोन निव्वळ व्यावसायिक पैलूचा असला तरी प्रेक्षकांना तो खटकणार नाही.

‘लार्जर दॅन लाईफ’चा अनुभव

व्हिज्युअल इफेक्ट्सच्या बाबतीत जिथे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीची विचारशक्ती संपते, तिथूनच राजामौलींची विचारशक्ती सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. ते इफेक्ट्स खोटे आणि उगाच अतिशयोक्ती केल्यासारखे वाटू नये, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. थिएटरमध्ये 100% ‘लार्जर दॅन लाईफ’चा अनुभव प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना येतो. त्यातील गाणी आणि पार्श्वसंगीतसुद्धा त्याच तोडीचं आहे. ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण म्हणजे ‘पॉवरपॅक’च आहेत. त्यांचे अॅक्शन सीन्स, त्यांचा अभिनय, त्यांचा डान्स मोठ्या पडद्यावर पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. रामचरण कुठेतरी वरचढ ठरतोय की काय, असं वाटत असतानाच ज्युनियर एनटीआर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. या दोघांनीही त्यांच्या भूमिका अगदी सरस साकारल्या आहेत. त्यातही रामचरण थोड्याफार प्रमाणात ज्युनियर एनटीआरपेक्षा उजवा ठरतो. आलिया आणि अजय देवगणनेही त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांना साजेसा असा अभिनय केला आहे.

क्लायमॅक्स

चित्रपटाचा वेळ कमी करण्याच्या प्रयत्नात क्लायमॅक्समध्ये काही गोष्टी गंडल्यासारख्या वाटतात. त्याठिकाणी एडिटिंगवर आणखी मेहनत घेता आली असती असं वाटतं. कारण सिनेमॅटिक लिबर्टी जरी म्हटलं तरी त्या गोष्टी क्लायमॅक्समध्ये पाहताना दिग्दर्शकाने घाई केल्यासारखं वाटतं. राजामौलींच्या चित्रपटात संकल्पनांचं महत्त्व किती असतं, हे पुन्हा एकदा शेवटी पहायला मिळतं. राम, सीता आणि रामायण यांचा संदर्भ घेत क्लायमॅक्सच्या गोष्टी साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी रामचरणचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला प्रेमात पाडतं.

कलाकार, त्यांचं अभिनय, कथा, VFX, अॅक्शन, ड्रामा, गाणी, दिग्दर्शन, कॅमेरा वर्क.. या सर्व गोष्टींचा विचार करता एस. एस. राजामौली यांचा हा आणखी एक ‘मास्टरपीस’ आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार आहे. राजामौली यांचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार पुन्हा एकदा RRR मधून स्पष्ट होतात, अधोरेखित होतात. एकंदरीत हा चित्रपट तुम्हाला तीन तास खुर्चीला खिळवून ठेवतो आणि ‘पैसा वसूल’ची अनुभूती देतो.

या चित्रपटाला 4 स्टार्स.

हेही वाचा:

Video: वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

साऊथ सुपरस्टार्सची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; राजामौलींच्या RRRचं जोरदार प्रमोशन

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.