Palak Tiwari | सैफच्या मुलासोबत पलक तिवारीची ‘मूव्ही डेट’; लपून-छपून भेटले पण झाली ‘ही’ एक चूक

2021 मध्ये गायक हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओतून पलकने पदार्पण केलं. हे गाणं त्यावेळी तुफान हिट ठरलं होतं. त्यानंतर तिला बऱ्याच पार्ट्यांमध्ये इब्राहिमसोबत पाहिलं गेलं.

Palak Tiwari | सैफच्या मुलासोबत पलक तिवारीची 'मूव्ही डेट'; लपून-छपून भेटले पण झाली 'ही' एक चूक
Ibrahim Ali Khan and Palak TiwariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 9:01 AM

मुंबई | 23 जुलै 2023 : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच श्वेताचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानशी जोडलं गेलं. या दोघांना एकत्र एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं. त्यावेळी पलकने पापाराझींपासून स्वत:चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये तिला इब्राहिमला डेटिंग करण्याबद्दल प्रश्न विचारला असता तो फक्त मित्र असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. मात्र पुन्हा एकदा ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. इब्राहिम आणि पलकला पुन्हा एकदा ‘मूव्ही डेट’ला जाताना पाहिलं गेलं. मुंबईतील जुहू इथल्या एका पीव्हीआरमधून पलक बाहेर पडताना दिसली. तिच्या पाठोपाठ नंतर इब्राहिमसुद्धा त्याच थिएटरमधून बाहेर पडला. यावेळी दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडेसुद्धा घातले होते.

पलक आणि इब्राहिमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. यावेळी पलकने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप, जॅकेट आणि त्याच रंगाची जीन्स असा लूक केला होता. तर इब्राहिम पांढऱ्या टी-शर्टवर काळा शर्ट आणि जीन्स अशा लूकमध्ये दिसला. पलकने इब्राहिमला डेट करण्याच्या चर्चांना फेटाळलं असलं तरी या दोघांना पुन्हा एकत्र एकाच ठिकाणी पाहिल्यानंतर अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे थिएटरमधून बाहेर पडताना इब्राहिमच्या हातात पलकचा जॅकेट पहायला मिळाला. तर पलक दुसऱ्या मार्गाने थिएटरमधून निघाली.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच सारा अली खान आणि इब्राहिम हे गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. यावेळी भाऊ-बहिणींसोबत पलकसुद्धा होती. एअरपोर्टवर तिघांना पापाराझींनी पाहिलं होतं. सारा आणि इब्राहिम हे दोघं एअरपोर्टवरून एकत्र बाहेर निघाले. त्यानंतर थोड्याच वेळात पलक त्यांच्या मागून निघताना दिसली होती.

2021 मध्ये गायक हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओतून पलकने पदार्पण केलं. हे गाणं त्यावेळी तुफान हिट ठरलं होतं. त्यानंतर तिला बऱ्याच पार्ट्यांमध्ये इब्राहिमसोबत पाहिलं गेलं. इब्राहिमसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता पलक एका मुलाखतीत म्हणाली होती, “शूटिंगमुळे मी खूप व्यग्र असते, त्यामुळे अशा चर्चांकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो. माझ्यासाठी हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. कदाचित अशा चर्चा होणं हा या इंडस्ट्रीचा एक भागच आहे. पण मी माझ्या कामाकडे अधिक लक्ष केंद्रीत करू इच्छिते.”

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.