“त्यांच्या संस्कारामध्ये ही गोष्ट..”; जया बच्चन यांच्या नावाच्या वादावर सचिन-सुप्रिया यांचं मत

आपल्या नावासोबत पतीचं नवा जोडण्यावरून ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेत हा मुद्दा खूप गाजला होता. त्यावर आता सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर या लोकप्रिय जोडीने प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांच्या संस्कारामध्ये ही गोष्ट..; जया बच्चन यांच्या नावाच्या वादावर सचिन-सुप्रिया यांचं मत
सुप्रिया पिळगांवकर, जया बच्चन, सचिन पिळगांवकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 9:42 AM

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाच्या वादामुळे चर्चेत आहेत. राज्यसभेत त्यांच्या नावासोबत पती अमिताभ बच्चन यांचं नाव घेतल्याने त्यांनी आधी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी स्वत:च ‘जया अमिताभ बच्चन’ असं नाव सभागृहात घेतलं होतं. यानंतर राज्यसभेत जेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या नावासोबत अमिताभ यांचं नाव जोडलं गेलं, तेव्हा त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. यावर आता मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता.

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची प्रतिक्रिया

पतीचं नाव जोडण्याबाबत प्रतिक्रिया देताना सचिन पिळगांवकर म्हणाले, “ही आपली संस्कृती आहे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये नाव घेतलं जातं, जे दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांना कोणाला आवडणं, न आवडण्यापेक्षा त्यांच्या संस्कारामध्ये ती गोष्ट आहे का, हे पण आपण पाहिलं पाहिजे.” त्यानंतर सुप्रिया म्हणतात, “तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मला असं कधी ऐकूच आलेलं नाही की, ही बघ सुप्रिया किंवा ही बघ सुप्रिया चाललीये. कधीच नाही. ते नेहमीच सचिनची बायको असंच म्हणतात. मी इथे काम करतेय, मराठीतसुद्धा तरी मला नेहमीच सचिनची बायको असंच म्हटलं गेलंय. मला अभिमान आणि खूप कौतुक आहे या गोष्टीचं. मी इथे म्हणायला पाहिजे की माझी काही वेगळी ओळख नाही का? पण असं काही नाहीये.”

सुप्रिया यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर सचिन त्यांना सांगतात, “मला पण सुप्रियाचा नवरा म्हणूनच ओळखतात.” त्यावर ते विनोद करतायत असं सुप्रिया म्हणतात. पण हा विनोद नसल्याचं सचिन स्पष्ट करतात. “मी विनोद करत नाहीये. मला पण सुप्रियाचा नवरा असं म्हणतात. अरे तुम्ही एकटे आलात, सुप्रिया नाही आल्या का? अरे पण मला एकट्याला बोलावलं ना तुम्ही, मी एकावर एक फ्री आहे का? तिला बोलवायला पाहिजे ना. मी आलो म्हणून माझ्यासोबत ती येईलच असं नाही”, असं ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“पण मला मात्र हे खूप आवडतं आणि आश्चर्य वाटतं की ही काहीतरी योजना आहे. मला माझं अस्तित्वच इथे असं ठेवायचं नाहीये की मी अभिनेत्री आहे आणि माझा प्रयत्नही तोच आहे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया यांनी दिली. त्यावर सचिन म्हणाले, “आमच्या जोडीवर लोकांचं खूप प्रेम आहे, ते भरभरून आशीर्वाद देतात. काही चित्रपटांमध्ये आमच्यात थोडा जरी दुरावा दाखवला गेला तरी ते प्रेक्षकांना सहन होत नाही. लोकांना ते आवडत नाही. ही ताकद आहे. त्यांना ते खोटंसुद्धा बघायचं नाहीये. त्यावरून तुम्हाला समजेल की ते आमच्यावर किती प्रेम करतात.” असं असलं तरी मला ते सचिनची बायको म्हणूनच ओळखतात, हे मात्र नक्की असल्याचं सुप्रिया ठामपणे सांगतात. “मला याबद्दल थोडीसुद्धा तक्रार नाही,” असंही त्या पुढे स्पष्ट करतात. त्यावर सचिन पिळगांवकर गमतीत त्यांना म्हणतात, “अर्थात, तुला नाही तर दुसऱ्या कोणाला ओळखणार की माझी बायको आहेस म्हणून..”

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर ही कलाविश्वातील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यामुळे पतीचं नाव जोडण्यावरून त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.