अमिताभ बच्चन रात्री 1 – 2 वाजेपर्यंत…, बिग बींबद्दल सचिन पिळगांवकर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Sachin Pilgaonkar on Amitabh Bachchan: एकाच हॉटेलमध्ये राहायचे अमिताभ बच्चन - जया बच्चन, पण बिग बी रात्री 1 - 2 वाजेपर्यंत..., सचिन पिळगांवकर यांनी सांगितला 'तो' किस्सा, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठी गोष्ट समोर...
Sachin Pilgaonkar on Amitabh bachchan: सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठा किस्सा सांगितला आहे. सचिन पिळगांवकर आणि अमिताभ बच्चन यांनी ‘सत्ते पर सत्ता’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर बिग बी रात्री 1 – 2 वाजेपर्यंत पार्टी करायचे आणि अभिनेत्री जया बच्चन त्यांना शोधत असायच्या. एवढंच नाही तर, सचिय पिळगांवकर यांनी बिग बींच्या स्वभावाबद्दल देखील मोठी गोष्ट सांगितली.
एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘सत्ते पर सत्ता’ सिनेमासाठी आम्ही काश्मीर येथे होतो. तेव्हा अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि दोन मुलं देखील त्यांच्यासोबत आले होते. बिग बी त्यांच्या कुटुंबासोबत ओबेरॉय पॅलेस हॉटेलमध्ये थांबले होते आणि सिनेमाची इतर कास्ट ब्रॉडवे हॉटेलमध्ये. पॅकअप झाल्यानंतर अमिताभ बच्चन थेट आमच्या हॉटेलमध्ये यायचे..
View this post on Instagram
‘जया बच्चन, बिग बींना शोधत असायच्या. तेव्हा मोबाईल नव्हते. म्हणून अमिताभ बच्चन सांगायचे जया यांना फोन करून सांगा मी तुमच्यासोबत आहे. बिग बी आमच्यासोबत रात्री 1 – 2 वाजेपर्यंत बोलत असायचे. त्यांना आमच्यासोबत बसायला आवडायचं…’ असं सचिन पिळगांवकर म्हणाले.
अमिताभ बच्चन यांचं कौतुक करत सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘बिग बी त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर सन्मान करतात. पण छोट्यांचा देखील अमिताभ बच्चन आदर करतात. शूटिंग दरम्यान ते बसलेले असतील आणि कोणी त्यांना भेटण्यासाठी आलं तर ते उभे राहतात आणि हात मिळवतात… हे बिग बींचे संस्कार आहेत..’
पुढे पिळगांवकर म्हणाले, ‘सेटवरचं वातावरण प्रचंड हसतं – खेळतं असायचं. आम्ही सहलीसाठी आलोय असं आम्हाला वाटत होतं. आम्ही सर्व बेशिस्तांमध्ये अमिताभ बच्चन एकटे शांत आणि प्रामाणिक होते. शिस्तप्रिय असताना देखील अमिताभ बच्चन यांनी आमच्या सर्वांसोबत मस्ती केली. सर्वांसोबत त्यांची मैत्री देखील घट्ट झाली होती…’ असं देखील सचिन पिळगांवकर म्हणाले.