प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप, फरार अभिनेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, ‘तो’ म्हणाला…

तब्बल सहा जिल्हे अभिनेत्याचा पाठलाग करून मुंबई पोलिसांनी त्याला पकडलं, पोलिसांनी ताब्यात घेताच अभिनेता म्हणाला..., गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेता वादाच्या भोवऱ्यात... फरार झाल्यानंतर त्याचा अडचणी...

प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप, फरार अभिनेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, 'तो' म्हणाला...
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 11:17 AM

बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. साहिल खानवर बेटिंग साईट चालवण्याचा आणि सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ज्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता अभिनेत्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. साहिल खान याचा अटकपूर्व जामिनची याचिका फेटाळल्यानंतर साहिल खान हा मुंबईतून फरार झाला. पण आता पोलिसांनी अभिनेत्याला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.’ असं अभिनेता म्हणाला. पोलिसांना साहिल खान याला मुंबईत आणलं आहे. आता अभिनेत्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

मुंबईतून गोवा, गोवातून कर्नाटका, मग हैद्राबाद असा प्रवास अभिनेता करत होता. मुंबई पोलिसांचे पथकही त्यांच्या मागावर होते. हैद्राबादहून साहिल खान हा छत्तीसगड येथील जगदलबपूर येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले… तब्बल सहा जिल्हे साहिल खानचा पाठलाग करून मुंबई पोलिसांनी त्याला पकडले… मुंबईत आणल्यानंतर साहिल खानवर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती..

साहिल फरार झाल्यानंतर पोलीस पुन्हा अभिनेत्याला शोधत आहेत. साहिलने पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेकवेळा आपले लोकेशन बदलले. याआधी 18 एप्रिल रोजी महादेव बेटिंग ॲप प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने साहिल खानची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे 4 तास चालल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सर्वत्र साहिल याची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान साहिलने या प्रकरणात त्याची कोणतीही भूमिका नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे. अंमलबजावणी संचालनालय महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी 32 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अनेक सेलिब्रिटी संचालनालय महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अडकले आहेत.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत. ‘स्टाईल’नंतर साहिल ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्लास’, ‘ये है जिंदगी’ अशा केवळ मोजक्याच सिनेमांमध्ये दिसला.

तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.