Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | सैफ-तैमूर यांना पाहिल्यानंतर लावले ‘जय श्री राम..’ चे नारे; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेवर चिडले लोक

'सिनेमे असे बनवा पुढच्या ४ पिढ्या शिव्या...', सैफ-तैमूर यांना एकत्र पाहिल्यानंतर अनेकांनी लावले 'जय श्री राम..' नारे, पण अभिनेत्याच्या 'या' कृतीमुळे भडकले नेटकरी

Adipurush | सैफ-तैमूर यांना पाहिल्यानंतर लावले 'जय श्री राम..' चे नारे; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेवर चिडले लोक
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 12:56 PM

मुंबई | सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. शुक्रवारी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित तर झाला, पण आता सिनेमाला सर्वच स्तरातून विरोध आहे… अनेकांनी तर ‘आदिपुरुष’ म्हणजे कलयुगी रामायण असं देखील म्हटलं आहे. एवढंच नाही तर, सिनेमातील कलाकारांवर देखील अनेक जण निशाणा साधत आहेत.. ‘आदिपुरुष’ सिनेमात अभिनेता सैफ अली खान याने महत्वाची भूमिका साकारली आहे. सैफने ‘आदिपुरुष’ सिनेमात लंकेश ही भूमिका साकारली आहे. सिनेमातील अभिनेत्याचा लूकमुळे देखील नवा वाद निर्माण झाला. अशात नुकताच सैफ याला मुलगा इब्राहिम आणि तैमूर अली खान यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. सैफ मुलांसोबत सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेला होता.

सिनेमागृहातून बाहेर येताना सैफला दोन मुलांसोबत कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. पण याचदरम्यान असं काही झालं, ज्यामुळे सैफ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. सैफ सिनेमा पाहण्यासाठी मुलांसोबत चित्रपटगृहात आला होता. तेव्हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेता बाहेर येताच जमलेल्या सर्वांनी “जय श्री राम”चे नारे लावले.. अशात सैफ ने पापाराझींकडे पाहिलं हात जोडले आणि अभिनेता निघून गेला…

हे सुद्धा वाचा

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने सैफचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सैफने हात जोडून सर्वांना अभिवादन तर केलं, पण त्याने ‘जय श्री राम’ असा नार न दिल्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.. ‘जय श्री राम’वर सैफने कोणती प्रतिक्रिया का दिली नाही…असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे..

व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हा जय श्री राम बोलणार नाही…’ तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘याच्याकडून जय श्री राम बोललं जात नाही असं वाटत आहे..’ तर तिसरी नेटकरी म्हणाला, ‘सिनेमे असे बनवा पुढच्या ४ पिढ्या शिव्या देतील..’ सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ सिनेमा आणि लंकेश भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खान याचा विरोध करण्यात येत आहे..

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील नाराजी जाहिर करत आहेत. तर सिनेमातील डायलॉगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय आता सैफच्या व्हायरल व्हिडीओमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे..

लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.