‘आम्ही फक्त मुलांना जन्म देतो आणि…’, 4 मुलांचा बाप सैफ अली खान याचं मोठं वक्तव्य

Saif Ali Khan : दोन पत्नी, चार मुलं... सौफ अली खान म्हणाला, 'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो आणि...', अभिनेत्याचं वक्तव्य तुफान चर्चेत... सौफ कायम त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे करत असतो... आता देखील अभिनेत्याने केलंय मोठं वक्तव्य...

'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो आणि...', 4 मुलांचा बाप सैफ अली खान याचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 12:37 PM

मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमध्ये नेपोटीजम आणि स्टारकिड्स यांची चर्चा कायम रंगलेली असते. जवळपास 8 वर्षांपूर्वीपासून सेलिब्रिटींच्या मुलांनी अधिक प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. आता अभिनेता सैफ आली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांची दोन मुलं तैमूर अली खान आणि जेह अली खान यांना अधिक प्रसिद्धी मिळते. यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सैफ अली खान याने मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, ‘सेलिब्रिटी आणि फिल्मी कुटुंबाचं आडनाव असल्यामुळे किती फायदा होतो?’ असा प्रश्न सैफ करीना यांना विचारण्यात आला. यावर दोघांनी देखील लक्षवेधी उत्तर दिलं आहे. प्रश्नाचं उत्तर देत करीना म्हणाली, ‘तुमच्याकडे कोणतंही आडनाव असलं तरी, आडनाव तुमचं यश ठरवत नाही. तुमच्याकडे किती कौशल्य आहे. तुम्ही किती यशस्वी आहात याचा निर्णय प्रेक्षक घेत असतात.’

करीना पुढे म्हणाली, ‘सोशल मीडियाच्या काळात कोणतीच गोष्ट ठरलेली नाही. लोकं उत्साही असतात. लोकं फोटो पाहतात. तुमचे 40 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तुम्हाला 30 हजार लाईक्स मिळतात… याचा अर्थ तुम्ही स्टार आहात असं होत नाही… हे सिद्ध करुन दाखवावं लागतं.’ असं देखील करीना म्हणाली

हे सुद्धा वाचा

सैफ अली खान म्हणाला, ‘लोकांना सेलिब्रिटींच्या मुलांबद्दल आकर्षण असतं. आम्ही फक्त मुलांना जन्म देतो. पण माध्यम, फोटोग्राफर्स आणि चाहते त्यांना स्टारकिड्स बनवतात. त्यानंतर प्रसिद्धीझोतात असल्यामुळे त्यांना सिनेमांमध्ये संधी मिळते.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ आणि करीना यांनी स्टारकिड्सबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, करीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम तैमूर आणि जेह यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, तैमूर आणि जेह यांचे सोशल मीडियावर फॅनपेज देखील आहेत.

तैमूर आणि जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूर आणि जेह यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि सैफ आणि करीना यांच्या मुलांची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सौफ अली खान चार मुलांचा बाप आहे. सैफ याची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. सैफ – अमृता यांच्या मुलीचं नाव  सारा अली खान आणि मुलाचं नाव  इब्राहिम अली खान असं आहे.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.