पतौडी इस्टेटची हीच भावी मालकीण; इब्राहिमसोबतच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासूनच तिचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय.

पतौडी इस्टेटची हीच भावी मालकीण; इब्राहिमसोबतच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Ibrahim Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 8:41 AM

मुंबई : 1 जानेवारी, 2024 | बॉलिवूड किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांना डेटिंग लाइफबद्दल गुपित बाळगणं हे फारच आव्हानात्मक आणि कठीण असतं. कारण ते कुठेही गेले तरी पापाराझी त्यांची पाठ सोडत नाहीत. सध्या सैफ अली खानचा मुलगी इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही जोडी सोशल मीडियावर यामुळे तुफान चर्चेत आली आहे. नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला या तरुण जोडीला मुंबईत पुन्हा एकत्र पाहिलं गेलं. यावेळी इब्राहिमने पापाराझींपासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. पलक आणि इब्राहिम हे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबद्दल दोघांनी अद्याप कोणतीच जाहीर कबुली दिली नाही.

पापाराझींनी पलक आणि इब्राहिमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये दोघं एका कारमध्ये मागच्या सीटवर बाजूबाजूला बसलेले पहायला मिळत आहेत. पापाराझी जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्पॉटलाइट मारतात, तेव्हा इब्राहिम त्याचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करतो तर पलक खाली मान घालून तिच्या फोनमध्ये बघत राहते. पलक आणि इब्राहिमला अशाप्रकारे एकत्र पाहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही पार्ट्यांमध्ये, कॉन्सर्टमध्ये आणि काही कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

2022 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पलक इब्राहिमबद्दल व्यक्त झाली होती. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत पलक म्हणाली होती, “मी माझी आई श्वेता तिवारीमुळे माझा चेहरा झाकते. त्यामागे दुसरं कोणतंच कारण नाही.” तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सैफ अली खानला त्याच्या मुलाच्या गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “इब्राहिमची गर्लफ्रेंड कशी असावी, यासाठी तुझे काही मापदंड आहेत का”, असा प्रश्न करणने सैफला विचारलं. त्यावर सैफ म्हणाला, “मी काय विचार करतो, त्याने फरक पडत नाही. कारण माझं कोणीच ऐकत नाही. जरी इब्राहिम मला काही सल्ले विचारत असला तरी मी इतकंच म्हणेन की ती मुलगी सिंगल असावी. त्याच्या आयुष्यात येणारी मुलगी ही सिंगल असावी.”

इब्राहिम अली खान हा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. तर दुसरीकडे पलकने बऱ्याच म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलंय. गेल्या वर्षी ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.