चाकू हल्ल्यात सैफ अली खान याच्या स्पायनल कॉर्डला जखम, अशा दुखापती का असतात धोकायदायक?
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan injury) याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सैफ याच्यावर चाकूचे सहा वार करण्यात आले ज्यामुळे त्याच्या मणक्याला मोठी दुखापत झाली आहे. पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीचे काय आहेत धोके पाहूयात..
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल मध्यरात्री त्याच्या निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोराने सैफवर जोरदार सहा वार केले आहेत.त्यानंतर त्याचा मुलगा इब्राहिम अली खान याने वडिलांना रिक्षातून लीलावतीत दाखल केले आहे. यानंतर सैफ याच्यावर तातडीने शस्रक्रिया करण्यात आली आहे. या हल्ल्यात एक वार सैफ अली खान याच्या मणक्यात लागला असून त्याने त्यांच्या स्पायनल कॉर्डला धक्का बसून गंभीर जखम झाली आहे. हात आणि मानेवर देखील मोठ्या जखमा झाल्या आहेत. स्पायनल इंज्युरी झाली असून मणक्यातून २.५ इंचाचा चाकूचे पाते बाहेर काढले आहे. सध्या सैफ अली खान याची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. पाठीच्या मणक्यातील मज्जासंस्थेला धक्का बसल्याने या ही जखम किती गंभीर याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
मणक्यात मेंदूला आणि संपूर्ण शरीराला संवेदना पोहचविणारा मज्जारज्जू असतो. त्यामुळे येथे जर मोठी जखम झाली तर मोठा धोका होऊ शकतो असे म्हटले जाते. चाकूच्या हल्ल्याने नर्व्हस सिस्टीम आणि नसांसह अनेक भागांना धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात स्पाईन सर्जरीचे कंन्सलटंट डॉ. तरूण सूरी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. जर मणक्यास जखम ( spinal injury injury recovery risks ) होऊन मज्जासंस्थेला धक्का लागला तर मोठा धोका असतो असे डॉ. तरुण सुरी यांनी म्हटले आहे.
मणका का महत्वाचा असतो ?
मणक्यात मज्जारज्जू असल्याने या भागात इजा होणे गंभीर असते. हा शरीराचा महत्वाचा भाग असून मेंदूपासून शरीरात इतर भागांना संदेश पोहचविण्याचे काम स्पाईन कॉर्ड करीत असते. अशात जर मणक्यास मोठी इजा झाली तर पॅरालिसिस, बधिरता या सह कायम स्वरुपाचे अपंगत्व येऊ शकते. या मणक्याच्या शेजारील मुख्य रक्तवाहिन्यांना देखील नुकसान यामुळे पोहचू शकते. ज्यामुळे नर्व्ह डॅमेज किंवा जीवघेणा रक्तस्राव होऊ शकतो असे डॉ.तरुण सुरी यांनी सांगितले.
काय असते स्पायनल इंज्युरी ?
स्पायनल इंज्युरी ( एससीआय ) तेव्हाच होते जेव्हा मणक्याला मोठी जखम होते. नर्व्ह फायबर हे तुमच्या मेंदूला तुमच्या शरीराच्या सर्व भागांशी जोडत असतो.स्पायनल कॉर्डला झालेल्या नुकसानामुळे सेंसर सिग्नल बाधित होऊ शकतो. आणि स्नायूंच्या जखमांमुळे गंभीर ते कायम स्वरुपाचे नुकसान होऊ शकते.