माझ्या मुलाने कधी झुरळ नाही मारला, तर तो…., सलमान खानच्या जीवाला धोका, वडिलांना सांगितली सत्य परिस्थिती

Salman Khan: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खान यांचं काहीही कनेक्शन नाही, वाद खरं तर..., बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागचं खरं कारण सलीम खान सांगितलं... भाईजानबद्दल म्हणाले, 'माझ्या मुलाने कधी झुरळ नाही मारला, तर तो...'

माझ्या मुलाने कधी झुरळ नाही मारला, तर तो...., सलमान खानच्या जीवाला धोका, वडिलांना सांगितली सत्य परिस्थिती
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 8:48 AM

काळवीट शिकार प्रकरणी गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर अभिनेता सलमान खान आहे. तर ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कनेक्शन देखील सलमान खानशी जोडलं जात आहे. यावर सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी मोठा खुलासा केला असून करण्यात येत असलेले दावे देखील फेटाळून लावले आहेत. ‘माझ्या मुलाने कधी झुरळ देखील मारला नाही. तो एका प्राण्याची हत्या कशी करेल. त्याची चुकी नसताना तो माफी का मागेल… सलमान तर प्राण्यांवर प्रेम करतो.’ असं सलीम खान म्हणाले.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खान कनेक्शन यावर सलीम खान म्हणाले, ‘बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सलमान खानशी काहीही संबंध नाही. लॉरेन्स बिश्नोई याने हत्येची जबाबदारी स्वीकारली असली तरी सलमानचं काहीही कनेक्शन नाही ही गोष्ट कुटुंबाला माहिती आहे.’ सलीम खान यांच्यानुसार, संपत्तीचे वाद असल्यामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली.

काळवीट शिकार प्रकरणी सलमी खान यांचं वक्तव्य

‘मी कधी कोणत्या प्राण्याला मारलं आहे आणि सलमानने कधी कोणत्या प्राण्याला मारलं आहे. सलमानने कधी झुरळ देखील मारलं नाही. याप्रकरणी मी सलमानला विचारलं, तो म्हणाला, घटना घडली तेव्ही मी तिकडे मी नव्हतो. मा कारमध्ये देखील मी नव्हतो. तो कधीच माझ्यासोबत खोटं बोलणार नाही. आम्ही तर बंदुकीचा देखील वापर करत नाही…’ असं सलीम खान म्हणाले.

सलमानला मिळत असलेल्या धमक्यांबद्दल सलीम खान म्हणाले,

‘जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टी देवावर आधारलेल्या आहे. हे कुराण शरीफमध्ये आहे – सन्मान, अपमान, जीवन आणि मृत्यू माझ्या हातात आहे.’ असं सलीम खान म्हणाले.

सलमान खान का माफी मागेल – सलीम खान

‘जीवावर आणि मृत्यू त्यांच्या हातात आहे तर बघू… आणि सलमानची काही चूक नसेल तर तो का माफी मागेल. माफी कधी मागतात जेव्हा तुम्ही काही चुकीचं केलं आहे. तुम्ही कोणाची फसवणूक केली आहे कोणाला दुःख पोहोचवलं आहे, त्रास दिला आहे… असं असेल तर माफी मागायला काहीही हरकत नाही.’

हे खंडणीसाठी केलं जातंय – सलीम खान

सलीम खान म्हणाले, ‘पोलिसांनी आम्हाला घराच्या काही भागात बसण्यास मनाई केली आहे. पूर्वी मी ज्या ठिकाणी बसायचो त्या ठिकाणी पोलिसांनी मला स्पष्टपणे रोखलं आहे कारण त्याच एका भागात एक गोळीबार देखील झाला आहे. आता प्रकरण मिटवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली जात आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं हे खंडणीचं प्रकरण आहे… असं देखील सलीम खान म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.