दोघं भांडत राहिले, तिला मात्र…, सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन

Salman Khan | ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी केला मोठा खुलासा, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणांबद्दल सलीम खान म्हणाले..., सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात...

दोघं भांडत राहिले, तिला मात्र..., सलमान - विवेक यांच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 11:53 AM

अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहे. गोळीबारानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. शिवाय सहा जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. याआधी देखील अभिनेत्याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. यावर सलमान खान याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी मौन सोडलं होतं. आता देखील सलीम खान यांनी भाईजनचं लग्न, विवेक ओबेरॉय सोबत झालेले वाद… यांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सलीम खान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे वाद टोकाला गेले. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात विवेक याची एन्ट्री झाली. त्यानंतर विवेक आणि सलमान यांच्यात अनेक वाद झाले. यावर सलीन खान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सलीम खान म्हणाले, ‘काही विषय भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघे तेव्हा भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले…’ ऐश्वर्या राय हिचं नाव न घेता सलीम खान यांनी मोठा खुलासा केला.

एवढंच नाही तर, सलीम खान यांनी सलमान खान याच्या लग्नावर देखील स्पष्टीकरण दिलं. 2009 च्या पूर्वी सलमान खान याचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिस हीट ठरत नव्हता. तेव्ही सलीम खान अभिनेत्याला म्हणाले होते, 2009 नंतर तुझ्या आयुष्यात खूप बदल होतील. 2009 नंतर भाईजानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. अभिनेत्याच्या लग्नाबद्दल देखील सलीम खान म्हणाले होते.

पुढच्या एक दोन वर्षा सलमान याचं लग् झालं तर होईल. असं नाही झालं तर, त्याच्या लग्नाच्या शक्यता फार कमी आहे. सलम खान यांनी भाईजानबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली. 2009 नंतर सलमान खान याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात मात्र कोणाची एन्ट्री झाली नाही. वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे.

अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘सिंकदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.