‘मंगळसूत्र नाही तर स्कार्फ…’, सर्वांसमोर कतरिना कैफ – सलमान खान यांचा रोमान्स, इम्रान हाश्मी मात्र…

Salman Khan : सर्वांसमोर कतरिना कैफ - सलमान खान यांचा रोमान्स, तर दुसरीकडे इम्रान हाश्मी यांच्या किसिंग सीनवर भाईजान म्हणाला...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिना कैफ - सलमान खान यांची चर्चा... व्हिडीओ पाहून म्हणाल...

'मंगळसूत्र नाही तर स्कार्फ...',  सर्वांसमोर कतरिना कैफ - सलमान खान यांचा रोमान्स, इम्रान हाश्मी मात्र...
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 1:15 PM

मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई करताना दिसत आहे. चाहत्यांना देखील ‘टायगर 3’ सिनेमा प्रचंड आवडत आहे. दरम्यान, सिनेमाला यश मिळाल्यामुळे एका इव्हेंडचं आयोजन करण्यात आलं होतं. इव्हेंटमध्ये सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाश्मी पोहोचले. यावेळी सलमान खान याने सर्वांसमोर कतरिना हिच्यासोबत रोमान्स केला, तर इम्रान हाश्मी याच्या किसिंग सीनवर भाईजान याने मोठं वक्तव्य केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान – कतरिना यांच्या रोमान्सची चर्चा रंगली आहे.

सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये सलमान आणि कतरिना ‘लेके प्रभ का नाम’ गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहे. तर एका व्हिडीओमध्ये सलमान कतरिना हिच्या गळ्यात स्कार्फ टाकताना दिसत आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने ‘मंगळसूत्र नाही तर स्कार्फ…’ असं कमेंटमध्ये म्हणाला आहे.

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, कतरिना कैफ हिच्यासोबत सिनेमात केलेल्या रोनान्सबद्दल देखील अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. भाईजान म्हणाला, ‘सिनेमात कतरिना कैफ आहे तर, तिच्यासोबत थोडा रोमान्स केला तरी काही हरकत नाही…’ सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगत आहेत.

इम्रान हाश्मी यांच्या किसिंग सीनवर भाईजान म्हणाला…

‘जर इम्रान हाश्मी आतिशच्या भूमिकेत नसता तर, लिपलॉक, किसिंग सीन नक्की असते. मला तर कधीच किसिंग सीनची सवय नव्हती. पण आता इम्रान हाश्मी याची देखील सवय सुटत आहे…’ असं देखील सलमान खान म्हणाला.

सध्या सर्वत्र सलमान खान – कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील फक्त आणि फक्त ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील ‘टायगर 3’ सिनेमा मोठी कमाई करत आहे. सिनेमाने 300 कोटी रुपयांचा गल्ला पार केल्याची देखील माहिती  समोर येत आहे.

‘टायगर’ सिनेमाच्या दोन्ही भागांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. आता ‘टायगर 3’ सिनेमावर देखील चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.