एक्स-गर्लफ्रेंड समोर येताच काय करतो सलमान खान? म्हणाला, ‘मुली आहेत बदनामी नको म्हणून…’
Salman Khan | 'मुली आहेत बदनामी नको म्हणून...', एक्स - गर्लफ्रेंड समोर येताच सलमान खान करतो असं काम..., सध्या सर्वत्र फक्त सलमान खान आणि भाईजानच्या खासगी आयुष्याची चर्चा... एक्स-गर्लफ्रेंड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य...
अभिनेता सलमान खान याने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याचं अभिनेत्रीसोबत सलमान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आज सलमान याच्या सर्व एक्स गर्लफ्रेंड त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. पण तरी देखील आजही अभिनेत्रींच्या नावाची चर्चा सलमान खान याच्यासोबत होते. एवढंच नाही तर, सलमान खान देखील त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सबद्दल अनेक ठिकाणी बोलताना दिसतो. काही दिवसांपूर्वी सलमान खान याने बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सर्व एक्स गर्लफ्रेंड्सबद्दल मोठा खुलासा केला होता..
‘कॉफी विथ करण’ शोमध्ये करण म्हणाला होता, ‘तुला असं वाटतं की तुझी एक्स गर्लफ्रेंड आनंदी राहावी. तिच्या आयुष्यात तिने सेटल व्हावं… नव्या कुटुंबाचा एक भाग व्हावं…’ पुढे करणने भाईजानला विचाचलं, ‘जर कोणत्याही कार्यक्रमात तुझी गर्लफ्रेंड तुझ्या समोर आली तर तू काय करतोस…’ यावर सलमान म्हणाला, ‘मी अशा वेळी कधीच समोर जात नाही. मी स्वतः दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो… कोणत्या मुलीविषयी नको त्या चर्चा रंगलेल्या आणि त्यांची बदनामी झालेली मला आवडणार नाहीत… म्हणून मी स्वतःला कधीही दूर ठेवतो…
पुढे करणने विचारलं, ‘तू आद्यापही एक्स गर्लफ्रेंडबद्दल प्रॉटेक्टिव्ह आहेस का?’ यावर सलमान म्हणाला, ‘100 टक्के मला असं वाटतं की, ती सुरक्षित आणि आनंदी असायला हवी… यासाठी मी प्रर्थना करतो.’ एक्सची आठवण आल्यानंतर कधी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? या प्रश्न उत्तर देत भाईजान म्हणाला, ‘कधीच नाही… असं माझ्यासोबत कधीच झालं नाही. ब्रेकअपनंतर सोमी अली फक्त संपर्कात होती. पण काही दिवसांनंतर तीच्यासोबत असलेले सर्व संबंध संपले…’ असं देखील सलमान खान म्हणाला.
सांगायचं झालं तर, सलमान खान एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगिता बिजलानी हिच्या संपर्कात आहे. आजही दोघे चांगले मित्र आहे. सलमान खान याच्या वाढदिवशी देखील संगिता अभिनेत्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्याच्या घरी गेली होती. दोघांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. रिपोर्टनुसार, सलमान – संगिता यांचं लग्न देखील होणार होतं. पण सलमान खान याने अभिनेत्रीची फसवणूक केल्यामुळे लग्न होऊ शकलं नाही… असं देखील अनेकदा समोर आलं…
सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता आता 58 वर्षांचा आहे. तरी देखील अभिनेता अविवाहित आहे. सलमान कायम त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. चाहत्यांमध्ये कायम भाईजानच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते.