Salman Khan birthday | बॉलिवूडच्या ‘दबंग’चा वाढदिवस यंदा GALAXYवर नाही, मग कुठे झाला साजरा?

सलमान खानने बांद्रा इथल्या आपल्या निवासस्थानाबाहेर एक नोटीस बोर्ड लावला आहे. त्यात आपल्या चाहत्यांसाठी सलमानने एक महत्वाचा संदेश लिहिला आहे.

Salman Khan birthday | बॉलिवूडच्या 'दबंग'चा वाढदिवस यंदा GALAXYवर नाही, मग कुठे झाला साजरा?
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 8:19 AM

मुंबई: बॉलिवूडचा दबंग आणि भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानचा आज 55वा वाढदिवस आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलमान खान यावर्षी आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणार नाही. त्याचबरोबर सलमान आज आपल्या GALAXY या निवासस्थानावरही असणार नाही. त्यामुळे GALAXY बाहेर गर्दी करु नका असं आवाहन सलमानने आपल्या चाहत्यांना केलं आहे. (Salman Khan celebrate his birthday in Panvel farmhouse)

सलमान खानने बांद्रा इथल्या आपल्या निवासस्थानाबाहेर एक नोटीस बोर्ड लावला आहे. त्यात आपल्या चाहत्यांसाठी सलमानने एक संदेश लिहिला आहे. “अनेक वर्षांपासून माझ्या चाहत्यांचं प्रेम आणि स्नेह मला मिळत आला आहे. मात्र यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, माझं चाहत्यांना आवाहन आहे की, घराबाहेर गर्दी करु नका, सामाजिक अंतर ठेवा,” अशी विनंतीच सलमानने आपल्या चाहत्यांना केली आहे.

दरम्यान, सलमानच्या चाहत्यांची गर्दी होऊ नये म्हणून GALAXY बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशापरिस्थितीतही सलमानचे काही चाहते मध्यरात्री त्याच्या घराबाहेर दाखल झाले आणि सलमानला जन्मदिनाच्या शुभेच्या देऊ केल्या. आम्हीही येऊ इच्छित नव्हतो, पण सलमानप्रति असलेलं प्रेम आम्हाला इथपर्यंत घेऊन आलं, अशी प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी दिली आहे. त्याचबरोबर सलमानकडून घेण्यात आलेल्या खबरदारीचं कौतुकही या चाहत्यांनी केलं आहे.

वाढदिवसासाठी सलमान फार्महाऊसवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या यंदाचा वाढदिवस GALAXY इथं साजरा न करता पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आणि मित्रांच्या उपस्थितीत सलमानने केक कापला. तसंच आपले बॉडिगार्ड आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीतही त्याने एक केक कापला. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

संबंधित बातम्या:

Big Heart | ‘रेस 3चं’ अपयश विसरून सलमान रेमोच्या मदतीला, पत्नीने मानले आभार!

PHOTO | ‘असली सोना…’, ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाच्या नव्या फोटोंनी नेटकरी घायाळ!

Salman Khan celebrate his birthday in Panvel farmhouse

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.