Sohail Khan Divirce : लग्नानंतर तब्बल 24 वर्षानंतर सोहेल आणि सीमा खान होताहेत विभक्त; सीमा म्हणते विवाहापेक्षा आमच्या मुलांचा आनंद महत्वाचा…

आपल्या नातेसंबंधाविषयी बोलताना आणि सोहेलविषयी सांगताना सीमा बोलली होती की, कधी कधी आपण मोठे होते, आणि त्या दिवसात आपले नातेसंबंध वेगळ्या दिशेला घेऊन जातात. आणि या गोष्टीमुळे मी मुळीच दुःखी नाही, कारण आम्ही दोघंही आनंदी आहोत, आणि आमची दोन मुलंही खूश आहेत.

Sohail Khan Divirce : लग्नानंतर तब्बल 24 वर्षानंतर सोहेल आणि सीमा खान होताहेत विभक्त; सीमा म्हणते विवाहापेक्षा आमच्या मुलांचा आनंद महत्वाचा...
सोहैल आणि सीमा
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 5:15 PM

मुंबईः अभिनेता सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान (Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा खान (Seema Khan) घटस्फोट घेत आहेत. दोघांनीही कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज (Divirce) केला आहे. सोहेल आणि सीमा ही दोघंही शुक्रवारी फॅमिली कोर्टाबाहेर दिसून आली. या दोघांनीही आपले वैवाहिक आयुष्य थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल खान आणि सीमा खान ही दोघंही शुक्रवारी फॅमिली कोर्टात हजर होती. दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केला असला तरी अजूनही त्या दोघांची संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

या दोघांनीही अचानकपणे विभक्त होण्याचा निर्णय का घेतला याची कोणालाही अजून कल्पना नाही. विभक्त होण्याचा निर्णय दोघांचा असून तो आमचा खासगी प्रश्न आहे असं दोघांचंही मत आहे, आणि तो खासगीच ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं दोघांचं मत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी गेल्या अनेक वर्षापासून ही दोघंही विभक्त राहत आहेत.

दोघांमध्ये वाद नाही तरीही…

या दोघांचा मित्र असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, सीमा आणि सोहेल यांच्यामध्ये कोणताही वाद नाही, मात्र घटस्फोट घेण्याचा निर्णय या दोघांनीही घेतला आहे. हा निर्णय घेताना आपापल्या आयुष्यात आपण प्रगती करण्याचा विचार आहे असंही सांगितले जात आहे. ही दोघं विभक्त होणार आहेत ही त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्ट आहे.

सीमा खान कोण आहेत..?

सीमा खान यांचे मूळनाव हे सीमा सचदेव आहे, ती फॅशन डिझायनर असून स्टायलिस्टसुद्धा आहे. तिच्याबाबतीत असं सांगितले जात आहे की, तिने आता स्वतःचे ब्युटी पार्लर सुरु केले आहे, आणि त्याचे नाव Kallista आहे. सुझैन खान आणि महीप कपूर यांच्यासोबत तिने मुंबईतील वांद्रे येथे 190 लक्झरी बुटीक उघडले असल्याचेही बोलले जात आहे..

विभक्त होणार अशी 2017 मध्येच चर्चा

सीमा सचदेवने सोहेल खान बरोबर 1998 मध्ये विवाह केला होता. त्यांना दोन मुले असून एकाचे नाव योहान आणि तर दुसऱ्याचे नाव निर्वाण आहे. विवाहाच्या चोवीस वर्षानंतर ही दोघं विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोघं 2017 मध्येच विभक्त होणार असल्याची त्यांची चर्चा होती. तर एवढ्यावरच ते थांबले नव्हते, नेटफ्लिक्सचा शो द फॅब्युलस लाईव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्ह या कार्यक्रमात ही दोघं विभक्त असूनसुद्धा एकत्र दिसली होती. या शोनंतर मात्र अनेकांची खात्री झाली होती की, ही दोघं आता एकत्र राहात नाहीत.

…आम्ही दोघंही आनंदी

या कार्यक्रमप्रसंगी आपल्या नातेसंबंधाविषयी बोलताना आणि सोहेलविषयी सांगताना सीमा बोलली होती की, कधी कधी आपण मोठे होते, आणि त्या दिवसात आपले नातेसंबंध वेगळ्या दिशेला घेऊन जातात. आणि या गोष्टीमुळे मी मुळीच दुःखी नाही, कारण आम्ही दोघंही आनंदी आहोत, आणि आमची दोन मुलंही खूश आहेत. यावेळी तिने हेही सांगितले होते की, आमचं पारंपरिक लग्न नाही, पण आम्ही दोघंही एकाच कुटुंबातील सदस्य आहोत, आणि आमच्या लग्नापेक्षा आमची मुलं सुखी असणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सलमान खानच्या घरातील हा दुसरा घटस्फोट आहे. याआधी अरबाज खान आणि मलाइका अरोरा ही दोघंही विभक्त झाली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.