घटस्फोटानंतर सोहेल खानसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण? भाईजानसोबत खास कनेक्शन
Sohail Khan and Shefali Bagga Video: 'सोहेल खान हिला करतोय डेट?' घटस्फोटानंतर सोहेल खानसोबत स्पॉट झालेली 'मिस्ट्री गर्ल' कोण? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान आणि त्याचे दोन भाऊ कायम खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अभिनेता सोहेल खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या सोहेल खान याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटो आणि व्हिडीओमध्ये सोहेल खान याच्यासोबत एक मुलगी देखील दिसत आहे. अशात घटस्फोटानंतर सोहेल सोबत दिसणार मुलगी कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2025 दरम्यान वानखेडे स्टेडियम बाहेर सोहेल खानला एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट करण्यात आलं. मिस्ट्री गर्लसोबत सोहेल बंगळुरू विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना पाहण्यासाठी येथे आला होता. स्टेडियम बाहेर सोहेल खानला एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट करण्यात आल्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.




View this post on Instagram
सोहेल खान याच्या सोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नाही तर, शेफाली बग्गा आहे. खुद्द शेफाली हिने देखील सोहेल खान याच्यासोबत फोटो सोशलम मीडियावर पोस्ट केले आहेत. घटस्फोटानंतर शेफाली बग्गा हिच्यासोबच अभिनेत्याला स्पॉट करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
शेफाली आणि सोहेल खान याच्या फोटोंवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सोहेल खान आता हिला डेट करत आहे?’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘शेफाली याच्यासोबत काय करत आहे?’ सध्या सर्वत्र शेफाली आणि सोहेल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
शेफाली आणि सलमान खान यांचं खास कनेक्शन
अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ मध्ये शेफाली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘बिग बॉस’मुळे शेफालीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये वाढ झाली. शेफाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.