Bigg Boss OTT 2 | ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या सेटवर सिगारेट ओढताना दिसला सलमान खान?, व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहत्यांना बसला धक्का
बिग बाॅस ओटीटी 2 धमाका करताना दिसत आहे. आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 मधून बाहेर पडलीये. नुकताच घरातील सदस्यांचा क्लास लावताना सलमान खान हा दिसला. नुकताच बिग बाॅस ओटीटी 2 मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 धमाल करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अब्दू रोजिक हा बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss OTT 2) च्या घरात गेला होता. मात्र, यादरम्यान मोठा किस्सा घडला. यावेळी अब्दू रोजिक याची बळजबरी किस करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला. मनीषा रानी हिने अब्दू रोजिक याची बळजबरी किस घेतली. हा व्हिडीओ (Video) व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मनीषा रानी हिला टार्गेट करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर यावर अब्दू रोजिक याने देखील भाष्य करत बिग बाॅस ओटीटीच्या घरात आपल्यावर बळजबरी झाल्याचे म्हटले.
या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा जोरदार क्लास लावताना दिसला आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर थेट सलमान खान हाच आलाय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेकजण हे सलमान खान याला टार्गेट करत आहेत. बिग बाॅस ओटीटी 2 चा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत असून शोदरम्यान सलमान खान हा सिगारेट ओढत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सलमान खान याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची सिगारेट असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. आता सलमान खान याचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
Haath mein cigarette while hosting ? Radhe mohan mode activated #SalmanKhan? ?? pic.twitter.com/bxpzJUiaUM
— ?UTKARSH?| Fan account (@BEINGRADHE2727) July 9, 2023
मुळात म्हणजे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलमान खान याच्या हातामध्ये काहीतरी सिगारेट सारखे पांढरे हे दिसत आहे. मात्र, सलमान खान याच्या हातामध्ये जे दिसत आहे ते सिगारेटच आहे असा दावा करणे चुकीचे ठरणार आहे. अनेकांनी थेट म्हटले की, बिग बाॅसच्या सेटवरही सलमान खान हा सिगारेट ओढतो.
चित्रपटाच्या सेटवर सिगारेट ओढतानाचा सलमान खान याचा हा पहिला फोटो किंवा व्हिडीओ नाहीये. यापूर्वीच बरेच सलमान खान याचे सिगारेट ओढतानाचे फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत. टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान हा सिगारेट ओढताना दिसला होता. यानंतर अनेकांनी त्याच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली होती.
काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि सलमान खान याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला होता. मात्र, असेही असतानाही प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली.