Radhe Title Track | सलमानचा स्वॅग, दिशा पाटनीचा हॉट लूक, पाहा ‘राधे’चा जबरदस्त टायटल ट्रॅक

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई'चा (Radhe : Your Most Wated Bhai) टायटल ट्रॅक प्रदर्शित झाला आहे.

Radhe Title Track | सलमानचा स्वॅग, दिशा पाटनीचा हॉट लूक, पाहा ‘राधे’चा जबरदस्त टायटल ट्रॅक
राधे टायटल ट्रॅक
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 1:45 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’चा (Radhe : Your Most Wated Bhai) टायटल ट्रॅक प्रदर्शित झाला आहे. सलमान खानने हे गाणे आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या गाण्यात सलमान खानचा फुल-ऑन स्वॅग दिसत आहे. गाणे त्याच्या चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. या गाण्यात दिशा पाटनीही हॉट लूकमध्ये दिसली आहे. या ट्रॅकला साजिद-वाजिद जोडीच्या साजिदने आवाज दिला आहे (Salman Khan Radhe Your Most Wanted Bhai Title Track released).

टायटल ट्रॅक येताच ट्रेंडींगमध्ये!

यंदाच्या ईदला अर्थात 13 मे रोजी सलमान खानचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ रिलीज होणार आहे. मेकर्सने आतापर्यंत चित्रपटातील ‘सीटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ ही गाणी रिलीज केली आहेत. आता ‘राधे’ चित्रपटाचा टायटल ट्रॅकही प्रदर्शित झाला आहे. सलमान खानने हे गाणे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन लिहिले आहे, ‘देवाच्या इच्छेने आणि सगळ्यांच्या पाठिंब्याने हे सगळं पार पडेल. द्वेष दूर करा. राधे राधे राधे’ गाण्यात सलमान खान बुलेट्स आणि इतर वाहनांसह अ‍ॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसला आहे, तर दिशा पाटनीचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.

पाहा व्हिडीओ :

‘त्या’ दृश्याची चर्चा

‘राधे’चा ट्रेलर सलमान खानच्या चाहत्यांनी खूप पसंत केला होता. यात तो दिशा पटनीला किस करतानाही दिसला होता. जरी निर्मात्यांनी ‘राधे’चा बिहाइंड द सीन व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात सलमानने सांगितले आहे की, त्याने नक्की काय केले. त्याने कीस केली परंतु ती दिसला नाही तर, टेपला केली. आपण हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला तर आपल्याला दिशेच्या ओठांवर टेप असल्याचे दिसून येईल (Salman Khan Radhe Your Most Wanted Bhai Title Track released).

चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. थिएटर व्यतिरिक्त प्रेक्षक ‘झी 5’वर ‘पे पर व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील आणि प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जातील.

थिएटर मालकांना केले अपील

जेव्हा सलमानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली तेव्हा त्याने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले होते की, त्याचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागेल.

(Salman Khan Radhe Your Most Wanted Bhai Title Track released)

हेही वाचा :

‘रामायणा’तील ‘रावणा’च्या निधनाची अफवा, ‘लक्ष्मण’ सुनील लहरींनी सांगितली सत्य परिस्थिती

Drishyam 2 | ‘दृश्यम 2’च्या घोषणेनंतर अडचणीत सापडला चित्रपट, निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.