Salman Khan | कास्टिंगसाठी सलमान खान याच्या नावाचा चुकीचा वापर, अभिनेता थेट म्हणाला, कायदेशीर कारवाई, वाचा काय घडले?
सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान हा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील सलमान खान हा दिसला मात्र, त्याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करताना सलमान खान दिसला. या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल यांनी बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मुळात म्हणजे किसी का भाई किसी की जान या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. चक्क सलमान खान याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटासाठी सलमान खान याने तगडी फी घेतली.
किसी का भाई किसी की जान हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आता सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे टायगर 3 चित्रपटामध्ये बऱ्याच दिवसांनंतर सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी धमाका करताना दिसणार आहे. दिवाळीच्या दरम्यान टायगर 3 हा चित्रपट रिलीज होणार आहे.
नुकताच सलमान खान याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळेच आता सलमान खान हा चर्चेत आलाय. सलमान खान याने शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सलमान खान आणि त्याची कंपनी कोणत्याही चित्रपटासाठी कास्ट कोणालाही करत नाहीये.
Official Notice! pic.twitter.com/uIvAQgYbwl
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 17, 2023
पुढे या पोस्टमध्ये लिहिले की, पुढील कोणत्याही चित्रपटासाठी आम्ही कोणत्याही कास्टिंग एजंटची नियुक्ती देखील केली नाहीये. कृपया तुम्हाला कास्टिंगशी संबंधित कोणताही मेल किंवा मेसेज मिळाल्यावर अजिबातच लक्ष देऊ नका. कोणत्याही मेल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. जर कोणी सलमान खान आणि त्याच्या चित्रपटाचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आता सलमान खान याने शेअर केलेली हीच पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी सलमान खान याच्या पोस्टवर कमेंट करत नेमके काय घडले हे विचारण्याचा देखील प्रयत्न केला आहे. सध्या सलमान खान हा बिग बाॅस ओटीटीला होस्ट करताना दिसत आहे. यानंतर बिग बाॅसच्या 17 व्या सीजनला देखील होस्ट करताना सलमान खान दिसेल.
गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. सलमान खान याला मिळणाऱ्या धमक्यांमुळे पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ देखील केलीये. मुंबई पोलिसांसह खासगी सुरक्षारक्षक हे सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी मेल पाठून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.