निरागस पतीची फसवणूक का केली? ट्रोलरच्या प्रश्नावर समंथाचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. लग्नाच्या चार वर्षांतच ही लोकप्रिय विभक्त झाली. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत त्रासदायक होती, असं समंथाने काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

निरागस पतीची फसवणूक का केली? ट्रोलरच्या प्रश्नावर समंथाचं सडेतोड उत्तर
Samantha Ruth Prabhu and Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 9:35 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. 2021 मध्ये ती पती नाग चैतन्यपासून विभक्त झाली. त्यानंतर काही महिन्यांनी तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं. मध्यंतरीच्या काळात समंथाने कामातून सहा महिन्यांचा ब्रेकसुद्धा घेतला होता. आता पुन्हा एकदा ती सक्रिय झाली आहे. नुकताच तिने तिच्या युट्यूब चॅनलवर आरोग्याशी संबंधित पॉडकास्ट सुरू केला आहे. मात्र घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतरही समंथाला ट्रोल करणं थांबलेलं नाही. तिच्या पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने तिला नाग चैतन्यबाबत खोचक प्रश्न विचारला. त्यावर समंथानेही सडेतोड उत्तर दिलं आहे. तिचं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

समंथा तिच्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये मॉर्निंग रुटीनविषयी सांगताना दिसतेय. सकाळी उठल्यापासून ती काय काय करते, याबद्दल ती सांगते. आरोग्याशी संबंधित पॉडकास्ट असतानाही या एपिसोडच्या कमेंटमध्ये एका युजरने समंथाला तिच्या पूर्व पतीबद्दल प्रश्न विचारला. ‘मला सांग, तू तुझ्या निरागस पतीची का फसवणूक केली’, असा सवाल संबंधित युजरने केला. त्यावर समंथाने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सचं तोंड गप्प केलं.

समंथाने लिहिलं, ‘माफ करा, पण या सवयी तुमच्या कामी येणार नाहीत. तुम्हाला यापेक्षा आणखी काहीतरी मजबूत उपायांची गरज आहे. तुम्हाला शुभेच्छा.’ समंथा तिच्या पॉडकास्टमध्ये योग साधना आणि प्राणायाम यांविषयी सांगत होती. त्यामुळे त्याचा संदर्भ देत तिने युजरला हे उत्तर दिलं.

हे सुद्धा वाचा

समंथाचं उत्तर-

समंथा आणि नाग चैतन्य 2010 पासून एकमेकांना डेट करू लागले होते. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 29 जानेवारी 2017 रोजी दोघांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथाने सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर केला होता.

याआधी इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान एका युजरने समंथाला पुन्हा एकदा लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला होता. ‘तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करतेय का’, असं संबंधित युजरने तिला विचारलं होतं. त्यावर उत्तर देताना समंथाने लिहिलं होतं, ‘घटस्फोटाची आकडेवारी पाहता ही वाईट गुंतवणूक ठरेल.’ इतकंच नव्हे तर या उत्तरात समंथाने घटस्फोटाचं प्रमाण सांगणारा डेटासुद्धा पोस्ट केला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.