Samantha | ‘टॉर्चरची वेळ झाली’, समंथाने पोस्ट केला आईस बाथ ट्रिटमेंटचा फोटो; जाणून घ्या फायदे

समंथाने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती बर्फाने भरलेल्या बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. 'टॉर्चरची वेळ झाली आहे' असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

Samantha | 'टॉर्चरची वेळ झाली', समंथाने पोस्ट केला आईस बाथ ट्रिटमेंटचा फोटो; जाणून घ्या फायदे
SamanthaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 12:59 PM

हैदराबाद : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या दमदार अभिनय कौशल्याने दाक्षिणात्यसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. मात्र अभिनयासोबतच समंथा तिच्या खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. अभिनेता नाग चैतन्यसोबत घटस्फोटानंतर काही महिन्यांनी समंथाने तिला ‘मायोसिटीस’ हा आजार झाल्याचं सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला. परदेशात काही दिवस उपचार घेतल्यानंतर समंथा भारतात परतली आणि तिला शूटिंगलाही सुरुवात केली. मात्र मायोसिटीस या आजारामुळे समंथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. नुकताच समंथाने त्याच्या एका उपचारपद्धतीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

समंथाने ‘सिटाडेल इंडिया’ या सीरिजसाठी बऱ्याच ॲक्शन सीन्सचं शूटिंग केलं. त्यासाठी तिला जबरदस्त वर्कआऊट करावा लागला होता. त्यानंतर आता तिला आईस बाथ ट्रिटमेंट घ्यावी लागत आहे. समंथाने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती बर्फाने भरलेल्या बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. ‘टॉर्चरची वेळ झाली आहे’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. अशा ट्रिटमेंटला नवीन असलेल्यांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ बर्फाच्या बाथटबमध्ये राहू नये असं म्हटलं जातं.

आईस बाथचे फायदे

  1. आईस बाथमुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. हेव्ही वर्कआऊट सेशननंतर स्नायूंसाठी आईस बाथ फायदेशीर ठरतं. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यातून बाहेर पडताच तापमानातील बदलामुळे ते पुन्हा वेगाने पूर्ववत होतात. यामुळे शरीरातील सर्व स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन आणि पोषकतत्वं वितरित होतात. स्नायूंच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
  2. आईस बाथचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकार शक्तीला चालना मिळते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  3. बर्फाच्या आंघोळीमुळे शरीर शांत होतं, त्यामुळे झोपंही चांगली लागते. मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

मायोसिटिस म्हणजे काय?

मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंना वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ किंवा वेदना. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.

मारेंगो क्यूआरजी रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संतोष कुमार म्हणाले, “मायोसिटिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे रुग्णाच्या स्नायूंवर त्याच्याच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो.”

“यात सहसा हात, खांदे, पाय, पार्श्वभाग, पोट आणि पाठीच्या स्नायूंवर परिणाम होतो. आजार आणखी बळावला असेल तर त्याचा अन्ननलिका, डायफ्राम आणि डोळ्यांच्या स्नायूंवरदेखील परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णांना बसल्यानंतर उभं राहताना, पायऱ्या चढताना, वस्तू उचलतानाही सहत्रा त्रास होतो”, असं ते पुढे म्हणाले.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.