Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“त्यांना माझा शाप लागेल, मी जवळच्या 5 जणांना गमावलंय..”; कोणावर भडकली प्रसिद्ध अभिनेत्री?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संभावना सेठने तिच्या एका व्लॉगद्वारे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. गेल्या काही वर्षांत जवळच्या पाच जणांना गमावल्याचं सांगत तिने टीकाकारांना शाप लागेल, असं वक्तव्य केलंय.

त्यांना माझा शाप लागेल, मी जवळच्या 5 जणांना गमावलंय..; कोणावर भडकली प्रसिद्ध अभिनेत्री?
संभावना सेठImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 25, 2025 | 11:50 AM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संभावना सेठने गेल्या काही वर्षांमध्ये तिच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत. परंतु आजसुद्धा त्या गोष्टींसाठी तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. नुकतंच संभावनाच्या पाळीव श्वानाचं निधन झालं. त्यानंतर आता एका व्लॉगद्वारे तिने तिच्या टीकाकारांना आणि खिल्ली उडवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. संभावनाने सांगितलं की तिच्या चेरी नावाच्या पाळीव श्वानाचं निधन किडणी निकामी झाल्याने झालं होतं. चौथ्या स्टेजवर असताना त्याने आपले प्राण गमावले. चेरीच्या निधनादरम्यानही लोकांनी तिच्याबद्दल वाईट कमेंट्स केल्याचं संभावनाने सांगितलं. “ज्या लोकांनी माझ्याबद्दल त्या काळातही वाईट कमेंट्स लिहिले, त्याचं देव भलं करो. जेव्हा चेरीचं निधन झालं तेव्हा मी दुबईला गेल्यामुळे लोकांनी निशाणा साधला होता. परंतु तिथे मी माझ्या सासू-सासऱ्यांसाठी गेली होती. त्यावेळीही मी सतत व्हिडीओ कॉलद्वारे चेरीच्या संपर्कात असायची”, असं ती म्हणाली.

याविषयी ती पुढे म्हणाली, “त्या लोकांना माझं चांगलं कामसुद्धा वाईट वाटतंय. वाईट काम केल्यावर तर मला थेट फाशी दिली पाहिजे. आज सोशल मीडियाची ही अवस्था आहे. दिवसरात्र मी चेरीची काळजी घेत होती. व्लॉगमध्ये मी काही वेळासाठी पतीची वेब सीरिज बघताना दिसले, तर त्यावरूनही लोकांनी माझ्यावर टीका केली. एकीकडे चेरी आजारी आहे आणि दुसरीकडे ही लोकं सेलिब्रेट करत आहेत, असं ते म्हणाले. ज्या लोकांना हे सर्व म्हटलंय, त्यांना त्यांच्या कर्माचा हिशोब इथेच द्यायचा आहे.”

हे सुद्धा वाचा

“मी माझ्या आयुष्यात बरंच काही गमावलंय. आधी माझे वडील गेले, त्यानंतर कोको गेली, नंतर आई आणि मग माझा गर्भपात. मी पाच जणांना गमावलंय. माझ्या बाळाचा चेहरा तर मी कधी बघूच शकले नाही. जी लोकं माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. आपण काय पाप करतोय, हे त्यांना समजलं पाहिजे. तब्येतीच्या कारणास्तव मध्यंतरी माझं वजन खूप वाढलं होतं. त्यावरूनही लोकांनी माझी खिल्ली उडवायला सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यात खूप काही सहन केलंय. इतक्यांदा आयव्हीएफ करणं काही सोपं नाही. मला बाळ होईल की नाही हे माहीत नाही. कारण त्यासाठी मी आता काहीच करणार नाही”, अशा शब्दांत संभावना व्यक्त झाली.

कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.