शोएब मलिकचा एकीसोबत तलाक, दुसरीसोबत निकाह.. आता तिसऱ्याच व्यक्तीची चर्चा

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. या चर्चांदरम्यान आता शोएबने थेट दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. सनाचंही हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने उमैर जस्वालशी निकाह केला होता.

शोएब मलिकचा एकीसोबत तलाक, दुसरीसोबत निकाह.. आता तिसऱ्याच व्यक्तीची चर्चा
Shoaib Malik and Sana Javed, Umair JaswalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 3:24 PM

मुंबई : 20 जानेवारी 2024 | पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने दुसऱ्यांदा निकाह केला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी त्याने निकाह केला असून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. या चर्चांदरम्यान शोएबने दुसऱ्या निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएबप्रमाणेच सना जावेदचंही हे दुसरं लग्न आहे. तिने उमैर जस्वालशी पहिलं लग्न केलं होतं. शोएब आणि सनाच्या निकाहदरम्यान सोशल मीडियावर उमैरविषयीही चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहे उमैर जस्वाल?

सना जावेदने 2020 मध्ये गायक उमैर जस्वालशी निकाह केला होता. कराचीमधल्या घरातच दोघांनी गुपचूप निकाह उरकला होता. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. उमैर जस्वाल हा इस्लामाबादमधील अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत निर्मातासुद्धा आहे. तो रॉक बँड ‘कयास’चा मुख्य गायकसुद्धा आहे. घटस्फोटाच्या आधीच उमैर आणि सनाने सोशल मीडियावरून एकमेकांसोबतचे फोटो डिलिट केले होते.

हे सुद्धा वाचा

कोण आहे सना जावेद?

सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी सौदी अरबमधील जेदाह याठिकाणी झाला. उर्दू टेलिव्हिजनवरील भूमिकांसाठी ती विशेष ओळखली जाते. कराचीतील विद्यापिठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2012 मध्ये तिने अभिनयात पदार्पण केलं. ‘खानी’, ‘रुसवाई’ आणि ‘डंक’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या आहेत.

ऑन रेकॉर्ड शोएब मलिकचा हा दुसरा निकाह असला तरी सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी आयेशा सिद्दिकी नावाच्या महिलेनं त्याच्याशी निकाह केल्याचा दावा केला होता. मात्र शोएबने हा दावा फेटाळला होता. त्यामुळे त्याचं हे तिसरं लग्न आहे की दुसरं याविषयी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. सानिया मिर्झाशी निकाह करण्यापूर्वी शोएबने आयेशा सिद्दिकीशी निकाह केल्याचा आरोप होता. आयेशा, तिची बहीण माहा आणि तिच्या कुटुंबीयांनी नॅशनल टेलिव्हिजनवर येत शोएबवर आरोप केले होते. आयेशाच्या या संपूर्ण प्रकरणाला शोएबने केवळ एक फसवणूक असल्याचं म्हटलं होतं.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.