Shoaib Malik : सानिया मिर्झाच्या वडिलांच्या प्रतिक्रियेने आला मोठा ट्विस्ट, ‘शोएबने सानियाला घटस्फोट नाही दिला, तर…
shoaib malik saniya mirza : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसऱ्यांदा विवाह केला आहे. यावर सानिया मिर्झा हिच्या वडिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणखी एकदा विवाहबंधनात अडकला आहे. पाकिस्तानची अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत निकाह केला असून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपासून सानिया मिर्झा शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता या विवाहामुळे शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र सानिया मिर्झाच्या वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काय म्हणाले सानिया मिर्झाचे वडील?
शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नाबाबत बोलताना, यह एक ‘खुला’ था असं इम्रान मिर्झा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. सानिया मिर्झा यांच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण ‘खुला’ म्हणजे इस्लाम धर्मानुसार पत्नीने नवऱ्याला सोडून देणे याला असं म्हटलं जातं.
View this post on Instagram
इस्लामनुसार ‘खुला’चा अर्थ
तलाक आणि खुला यामध्ये फरक नाही, पती आणि पत्नीमध्ये स्वत: पत्नी नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेते याला खुला असे म्हणतात. तर पती जेव्हा आपल्या पत्नीपासून विभक्त होतो त्याला तलाक बोललं जातं. जेव्हा पतीच्या बाजूने घटस्फोट दिला जातो तेव्हा पत्नी नवऱ्याच्या घरी तीन महिने राहू शकते. कुराणमध्येही याचा उल्लेख आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना एक मुलगा आहे. 2018 साली इझान मिर्झाचा जन्म झाला असून तो सानियाकडेच असतो. सानियाने गेल्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. तर शोएब मलिक अजूनही क्रिकेट खेळतो .
कोण आहे सना जावेद?
शोएब मलिक याच्या तिसऱ्या पत्नीचं नान सना जावेद आहे. 2012 मध्ये सना हिने टीव्ही मालिकेमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. सना खानी या मालिकेमधून चांगली प्रसिद्धीस आली होती. त्यासोबतच सामाजिक नाटक रुसवाई और डंकमध्ये तिच्या अभिनयाचं चांगलं कौतुक झालं होतं.