अंबानीच्या पत्नीसाठी संजू बाबाची ऋषी कपूरला मारहाण? नीतूने केली मध्यस्ती आणि…
नीता अंबानीं यांची नात्याने वहिनी असलेल्या टीना अंबानी या एकेकाळी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. टीना यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अनिल अंबानी यांच्याशी लग्न झाल्यानंतर मात्र त्यांनी इंडस्ट्रीला अलविदा केला.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. त्यांची पत्नी टीना अंबानी या बॉलीवूड अभिनेत्री होत्या. नीता अंबानीं यांची नात्याने वहिनी असलेल्या टीना अंबानी या एकेकाळी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. टीना यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अनिल अंबानी यांच्याशी लग्न झाल्यानंतर मात्र त्यांनी इंडस्ट्रीला अलविदा केला. टीना अंबानी यांनी आता स्वतःला समाजकार्यात झोकून घेतले आहे. त्यांनी वृद्धांसाठी एक संस्था सुरू केली आहे. याशिवाय त्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या चेअरपर्सनही आहेत.
टीना अंबानी म्हणजेच पूर्वाश्रमीची अभिनेत्री टीना मुनीम यांनी अभिनय जगताचा निरोप घेतला. परंतु, एकूण संपत्तीबाबत तिने आजच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. टीना अंबानी यांची एकूण संपत्ती 2331 कोटी रुपये आहे. त्याचे घर अतिशय आलिशान आहे. अबोड नावाच्या 17 मजल्यांच्या घरात त्या राहतात. त्यांच्याकडे एक खाजगी जेटदेखील आहे. 3.5 कोटी किमतीची Rolls Royce Phantom, 88 लाख किमतीची Audi Q7 तसेच मर्सिडीज GLK350 ज्याची किमत 77 लाख रुपये अशा महागड्या आहेत.
टीना मुनीम यांनी ‘देस परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 35 चित्रपटांमध्ये काम केले. फेमिना टीन प्रिन्सेस इंडिया हा किताबही त्यांनी पटकावला आहे. सुभाष घई यांच्या ‘कर्ज’ चित्रपटामध्ये टीना मुनीम आणि ऋषी कपूर ही जोडी खूप गाजली. या चित्रपटामुळे ते दोघे चांगले मित्र बनले. याच दरम्यान टीना मुनीम ही संजय दत्त याला डेट करत होती. पण, ‘रॉकी’ चित्रपटाच्या सेटवर संजय दत्त मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी टीना मुनीम हिने त्याच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. परंतु, संजय टीनाबाबत इतका पजेसिव होता की त्यासाठी तो काहीही करायला तयार होता.
ऋषी कपूर हा तिचा चांगला मित्र असल्याने ती अनेकदा त्याच्या घरी जात असे. ऋषी कपूरची पत्नी नीतू कपूर हिच्याशीदेखील तिची चांगली मैत्री झाली होती. पण, ऋषी आणि टीना यांचे अफेअर सुरु असल्याची चर्चा संजयच्या कानावर आली. टीनाबाबत पजेसिव असलेल्या संजूबाबाने थेट कृषी कपूर याचे घर गाठून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी नीतू कपूर हिने मध्यस्ती केली. नीतू कपूर हिने ते दोघे फक्त मित्र आहेत. त्यांच्यात तसे काही नाही हे त्याला पटवून दिले. त्यानंतर संजय दत्त राजी होऊन परत गेला. मात्र, या घटनेमुळे टीना आणि संजय यांच्या नात्यात मात्र कायमचा दुरावा निर्माण झाला.