Sanjay Dutta: संजूबाबू आता तमिळ चित्रपटसृष्टीत करणार डेब्यू ; साकारणार ‘ही’ महत्त्वाची भूमिका
लोकेश कनगराजच्या 'विक्रम' या चित्रपटाला दक्षिणेबरोबरच हिंदीतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळेच त्याने पुन्हा एकदा पॅन इंडिया चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. पुढील वर्षी दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचाही विचार आहे.
बॉलीवूड मधील चित्रपटापेक्षाही प्रेक्षकांचा ओढा आता दाक्षिणात्य चित्रपटांकडे (South movies)वाढताना दिसतोय. यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीला प्रेक्षक गेल्या काही महिन्यापासून नाकारताण दिसत आहेत. 9 महिन्यांनंतर हिंदी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्याचबरोबर दक्षिणेत हिंदी प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीलाही फायदा झाला आहे. चाहत्यांचा दक्षिणेकडे वाढता कल पाहून आता हिंदीतील कलाकारही (Artist) दक्षिणेकडे वळू लागले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार लोकेशने या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही(Sanjay Dutta) संपर्क केला आहे. चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नसले तरी ही बातमी ऐकल्यानंतर संजय दत्तच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
खलनायकाची भूमिका साकारणार
नुकतीच बातमी आली होती की थलपथी विजय लोकेश कनगराजच्या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांची भूमिका रजनीकांत यांच्या ‘बाशा’ चित्रपटातील भूमिकेपासून प्रेरित असेल. रिपोर्टनुसार लोकेशने या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही संपर्क केला आहे. चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नसले तरी ही बातमी ऐकल्यानंतर संजय दत्तच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
गँगस्टरवर आधारित चित्रपट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकेश कनागराजचा हा चित्रपट गँगस्टरवर आधारित आहे. या चित्रपटासाठी एकापेक्षा अधिक खलनायकांची गरज आहे. अशा परिस्थितीत लोकेशसाठी संजय दत्तपेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो. काही काळापूर्वी लोकेश आणि संजय दत्त या चित्रपटाबद्दल बोलताना दिसले होते. त्यानंतर त्याने संजय दत्तला 10 कोटी रुपये फी देऊन फायनल केले आहे. लोकेश कनगराजच्या ‘विक्रम’ या चित्रपटाला दक्षिणेबरोबरच हिंदीतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळेच त्याने पुन्हा एकदा पॅन इंडिया चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. पुढील वर्षी दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचाही विचार आहे. अशा परिस्थितीत थलपथी विजय आणि संजय दत्त यांच्या चाहत्यांसाठी 2023 हे वर्ष उत्कंठापूर्ण असणार आहे.