AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Serials : ‘फुलाला सुगंध मातीचा’मालिकेत संक्रांतीचा सण होणार साजरा, पहिल्या संक्रांतीला कीर्ती जिंकणार जीजी अक्कांचं मन?

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेसुद्धा संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.(Sankranti festival to be celebrated in 'Fulala Sugandh Maticha' serial)

Marathi Serials : ‘फुलाला सुगंध मातीचा’मालिकेत संक्रांतीचा सण होणार साजरा, पहिल्या संक्रांतीला कीर्ती जिंकणार जीजी अक्कांचं मन?
| Updated on: Jan 12, 2021 | 12:03 PM
Share

मुंबई : मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांति म्हटलं जातं. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. गेले अनेक वर्ष आपण घरात हा सण साजरा करतोय. मात्र या काळात टीव्ही मालिकांमध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या मालिकांच्या माध्यमातून नवनवीन ट्रेंड, पद्धती याची आपल्याला माहिती मिळते.

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेसुद्धा संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मालिकेतील बहूचर्चित पात्र म्हणजे कीर्तीची ही पहिलीच संक्रांत असल्यामुळे काळी साडी, हलव्याचे दागिने अशी साग्रसंगीत तयारी सेटवर करण्यात आली आहे. जीजी अक्कांनी कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला आहे. या पंधरा दिवसांत जर कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. त्यामुळे कीर्तीसाठी हे 15 दिवस निर्णायक असणार आहेत. या पंधरा दिवसांचं काऊन्टडाऊन याआधीच सुरु झालं आहे. त्यामुळे कीर्तीकडे आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत.

खरतर संक्रांतीचा सण म्हणजे आपापासातले हेवेदावे विसरायला लावणारा दिवस. तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या मुहुर्तावर कीर्ती जीजी अक्कांचं मन जिंकू शकेल का हे पहाणं आता उत्सुकतेचं असणार आहे.

काळ्या कपड्यांचे महत्त्व संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या वस्त्रांचा या दिवशी वापर केला जातो. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणाऱ्या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळ्या रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात आणि सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तीळगूळाच्या वड्या किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. आता हाच कार्यक्रम ‘फुलाला सुगंध मातीचा’च्या सेटवरसुद्धा होणार असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या 

Marathi Serial : ‘शिक्षक ते अभिनेता…’,वाचा रघू म्हणजेच संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

PHOTO | ‘शुभमंगल सावधान’, अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला ‘लग्न-बेडीत’! 

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.